देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 11, 2026
in मराठवाडा
0
पं.हरिभाऊ चारठाणकर मराठवाड्याचे गंधर्व
Please Share

डॉ. कमलाकर परळीकर यांचे प्रतिपादन, शास्त्रीय गायन आणि सरोद वादनाने सेलूकर भारावले; लोकसहभागातून संगीत महोत्सवाचा प्रारंभ

सेलू I प्रतिनिधी : स्वातंत्र्यपूर्व काळापासून संगीत आणि सेलूकरांचे अतुट नातं राहिले आहे. मराठवाड्यात शास्त्रीय संगीताचे बिजारोपण करून त्याच्या प्रचार, प्रसार आणि जनमानसात ते रुजवण्यासाठी संगीतरत्न स्वातंत्र्य सैनिक पंडीत हरिभाऊ चारठाणकर यांचे योगदान मोठे आहे, त्यामुळे ते खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे गंधर्व आहेत असे प्रतिपादन सुरमणी डॉ. कमलाकर परळीकर यांनी केले.

सेलू येथील साई नाट्यगृहात शनिवारी १० जानेवारी रोजी लोकसहभागातून आयोजित संगीतरत्न पं. हरिभाऊ चारठाणकर संगीत महोत्सवाचे उद्घाटन पार पडले, त्याप्रसंगी डॉ. परळीकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष मिलिंद सावंत, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, गोविंदभाऊ जोशी, डॉ. रामराव रोडगे, यशवंतराव चारठाणकर, महेशराव खारकर, निलेश बिनायके, श्रीकांत उमरीकर, मोहन खापरखुंटीकर आणि बाबासाहेब चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.


या महोत्सवाच्या प्रथम सत्रात मराठवाड्याची उदयोन्मुख गायिका सायली टाक यांनी राग मालकंस सादर करून प्रथम पुष्प गुंफले. त्यानंतर मुंबईच्या प्रसिद्ध गायिका सायली तळवलकर यांनी राग मारू बिहाग आणि बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल या अभंग गायनाने रसिक श्रोत्यांना भक्तीरसासोबतच आनंद, प्रेम व विरह रसाची अनुभूती दिली. पुणे येथील नितीन पुरोहित यांच्या सरोदवरील राग हेमंत आणि पलास काफी धून वादनाने रसिकांची मोठी दाद मिळवली. या कलाकारांना शांतीभूषण देशपांडे, जगमित्र लिंगाडे, यश खडके आणि शिवाजीराव पाठक यांनी साथसंगत केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नादब्रम्ह संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी सच्चिदानंद डाखोरे यांच्या मार्गदर्शनात नांदी गायन करून श्रोत्यांची वाहवा मिळवली. यामध्ये मनवा देशमुख, शरण्या मोहकरे, वैष्णवी बोठे, भक्ती शिंदे, ज्ञानेश्वरी शिंदे, श्रुती बोकन, सानवी शिंदे, आरोही उगले, यथार्थ गवलवाड, प्रज्योत पांचाळ, ध्रुव सुवर्णकार, रेणूका बोठे, ऋतुजा महाजन आणि माही सराफ यांचा समावेश होता. महोत्सवाचे प्रास्ताविक संयोजक श्रीकांत उमरीकर यांनी केले, सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले तर गंगाधर कान्हेकर यांनी आभार मानले. प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष चारठाणकर, सुरेखा चारठाणकर, वैशाली चारठाणकर आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

Post Views: 2,006
Please Share
Previous Post

शासकीय रेखाकला परीक्षा : ९२ विद्यार्थ्यांना ‘ए’ ग्रेड

Next Post

नितीन विद्यालय : चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
नितीन विद्यालय : चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

नितीन विद्यालय : चित्रकला परीक्षेचा निकाल १०० टक्के

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ