देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात १ लाख २ हजार मतदार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 15, 2026
in परभणी
0
परभणी जिल्ह्यात १,२२२ जणांचे अर्ज वैध
Please Share

नायब तहसीलदार जयश्री कोल्हे यांची माहिती

सेलू : राज्य निवडणूक आयोगाने १३ जानेवारी रोजी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, त्या अनुषंगाने जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. परभणी जिल्ह्यात ५४ जिल्हा परिषद गट तर १०८ पंचायत समिती गणांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी निवडणूक होणार आहे. यामध्ये सेलू तालुक्यातील ५ जिल्हा परिषद आणि १० पंचायत समितीच्या जागांसाठी निवडणूक होत आहे. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी (रोहयो, परभणी) शोभादेवी जाधव, तर सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार डॉ. शिवाजी मगर यांच्याकडे जबाबदारी आहे. निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनात प्रशासन व यंत्रणा सज्ज झाली आहे.

सेलू तहसील कार्यालयात गुरुवारी, १५ जानेवारी रोजी आयोजित पत्रकार परिषदेत नायब तहसीलदार (निवडणूक) जयश्री कोल्हे यांनी ही माहिती दिली. सेलू तालुक्यात मतदानासाठी १३० केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. एकूण १ लाख २ हजार ३६४ मतदार या प्रक्रियेत सहभागी होतील. यामध्ये ५२ हजार ५२० पुरुष, ४९ हजार ८३४ महिला आणि अन्य एका मतदाराचा समावेश आहे.

१ जुलै २०२५ रोजीची मतदार यादी यासाठी ग्राह्य धरली जाणार आहे. मतदान केंद्रांवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्पची व्यवस्था केली जाईल. स्वीप कार्यक्रमांतर्गत जनजागृतीवर भर दिला जाणार आहे. निवडणुकीसाठी आवश्यक मतदान यंत्रे उपलब्ध असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली आहे. उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादाही निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेसाठी उमेदवाराला ६ लाख रुपये, तर पंचायत समिती गणासाठी ४ लाख ५० हजार रुपये खर्च मर्यादा असेल, अशी माहिती कोल्हे यांनी दिली. निवडणूक विभागातील सहायक महसूल अधिकारी नारायण पिंपळे, गोविंद राठोड, अमोल खेडकर, विजय टेकाळे आदींची उपस्थिती होती.

निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम :

* निवडणूक सूचनेची प्रसिद्धी : १६ जानेवारी २०२६
* नामनिर्देशनपत्र (अर्ज) स्वीकारणे : १६ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६
* नामनिर्देशनपत्रांची छाननी : २२ जानेवारी २०२६
* उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत: २७ जानेवारी २०२६
* चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी प्रसिद्धी : २७ जानेवारी २०२६
* मतदानाचा दिनांक : ५ फेब्रुवारी २०२६
* मतमोजणी : ७ फेब्रुवारी २०२६

Post Views: 1,709
Please Share
Previous Post

विश्वास वसेकर यांच्या ‘अहल्या’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

Next Post

परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसचे वर्चस्व

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसचे वर्चस्व

परभणीत शिवसेना उबाठा, काँग्रेसचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर नाहीच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध; ग्राहक पंचायत आक्रमक,जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : अखिल भारतीय ग्राहक पंचायत, देवगिरी प्रांताच्या वतीने...

सेलू नगरपालिकेत 'अभय योजना' ठरली कुचकामी

सेलू नगरपालिकेत ‘अभय योजना’ ठरली कुचकामी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

नागरिकांकडून सक्तीच्या दंडासह ३५० लाखांचा विविध कर वसूल, निव्वळ थकबाकी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांचा नकार देशनिष्ठ प्रतिनिधी, सेलू : सेलू नगरपालिकेकडून फेब्रुवारी...

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

९९.७९ टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक २०२६ देशनिष्ठ प्रतिनिधी, परभणी : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी गुरुवारी, १८ जून...

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ