देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 26, 2026
in मराठवाडा
0
भारत महान प्रजासत्ताक राष्ट्र
Please Share

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर : परभणीत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात; दादा लाड यांच्या पद्मश्री पुरस्काराचा गौरव

परभणी : प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवारी, २६ जानेवारी रोजी येथील प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियमवर आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यात राज्याच्या सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी देशाला सामर्थ्यशाली बनविण्याचे आवाहन केले. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला आणि खरी सत्ता प्रजेच्या हाती सोपविण्यात आली, असे गौरवद्गार त्यांनी यावेळी काढले.

या सोहळ्यास जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. परभणीचे सुपुत्र श्रीरंग ऊर्फ दादा लाड यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. या पुरस्कारामुळे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विविध शाळांतील सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सामूहिक कवायत सादर केली. तसेच पोलीस दलातील टायसन आणि सिंबा या श्वानांनी सादर केलेली धाडसी प्रात्यक्षिके उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र ठरली. पोलीस दल, गृहरक्षक दल आणि विविध विभागांच्या चित्ररथांनी संचलनात सहभाग नोंदवला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Post Views: 1,697
Please Share
Previous Post

नूतन महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

Next Post

डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार

डॉ.सत्यनारायण लोया यांना जीवनगौरव पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ