देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा जालना

संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
January 30, 2026
in जालना, परभणी
0
संत तुकाराम विद्यालयात पालक मेळावा उत्साहात
Please Share

बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने पालक, विद्यार्थी मंत्रमुग्ध

आष्टी (ता.परतूर) : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांच्यातील सुप्त गुणांचे दर्शन घडवण्यासाठी संत तुकाराम विद्यालयात २७ जानेवारी २०२६ रोजी पालक मेळावा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘एकच ध्यास, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास’ हे ब्रीद समोर ठेवून आयोजित या सोहळ्याने पालकांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राचे अध्यक्षपद नितीन खंडेलवाल (दंत चिकित्सक) यांनी भूषवले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भरत वानखेडे (बीईओ), अश्विन भोंडवे, शितलताई सोळंके, नंदकिशोर परताणी, परमेश्वर राजबिंडे, विजयाताई सोळंके, निशिकांत अंधोरीकर, संस्थाध्यक्ष रामकिसन आबा सोळंके, राम सोळंके आणि वाघमारे उपस्थित होते. सुरासे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर गुंजाळ यांनी प्रास्ताविक केले.

आदर्श शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव :

याप्रसंगी विद्यालयातील लक्ष्मण धोतरे, वर्षा शिंदे आणि काशिनाथ दुकाने (सॉफ्टवेअर निर्मितीबद्दल ५००० रुपये बक्षीस) यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. तसेच प्रथम सत्रातील गुणवंत विद्यार्थी आणि जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचाही बक्षीस वितरण करून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी प्रथमेश ताठे, ऋषिकेश शेळके, सहशिक्षक डोळसे आणि अश्विन भोंडवे यांनी मनोगत व्यक्त केले. रोहिणी भाले यांनी आभार मानले.

सांस्कृतिक सत्रात कलाविष्कार

सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक सत्राला सुरुवात झाली. याचे अध्यक्षपद सिद्धू सोळंके यांनी भूषवले. यावेळी नंदकिशोर परताणी, नंदकिशोर आर्दड, जिजाभाऊ कदम, राजेभाऊ तौर आणि मुख्याध्यापक बळीराम काटे उपस्थित होते. गणेश वंदनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध नृत्यांनी आणि नाटिकांनी पालकांना मंत्रमुग्ध केले. इयत्ता नववीतील विद्यार्थिनींनी सुंदर सूत्रसंचालन केले. बादाडे यांनी ‘पानपोळी’ ही कविता सादर केली, तर जिजाभाऊ कदम यांनी सोळंके आबा-आत्या यांच्या जीवनकार्यावर कविता सादर केली. सांस्कृतिक विभाग प्रमुख परमेश्वर काष्टी यांनी आभार मानले.

Post Views: 1,684
Please Share
Previous Post

अजित पवार यांना सेलूकरांची भावपूर्ण आदरांजली

Next Post

जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण

जिल्हा परिषद : निवडणूक कर्मचाऱ्यांचे सेलूत प्रशिक्षण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ