देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

चार पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, दोन राष्ट्रवादीकडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 9, 2026
in परभणी
0
चार पंचायत समितीवर भाजपचा झेंडा, दोन राष्ट्रवादीकडे
Please Share

परभणी जिल्ह्यात तीन ठिकाणी त्रिशंकू स्थिती

परभणी : जिल्ह्यातील नऊ तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने सरशी केली आहे. जिल्ह्यातील जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम या चार पंचायत समितीवर भाजपने एक हाती सत्ता मिळवली आहे तर मानवत, सोनपेठ या दोन पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. परभणी, पूर्णा, पाथरी या ठिकाणी त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी सोमवारी, ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी झाली. जसजसे कल हाती येऊ लागली तसतसे विजय उमेदवारांच्या गोटात उत्साहाचे वातावरण पसरले. मतमोजणी स्थळीच फटाक्यांची आत्तषबाजी आणि जल्लोष सुरू झाला.

जिंतूर, सेलू, गंगाखेड, पालम भाजपकडे

जिल्ह्यातील जिंतूर पंचायत समितीवर पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने एकूण २० पैकी १४ जागा जिंकून एकहाती सत्ता प्रस्थापित केली आहे, तर माजी आमदार विजय भांबळे यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला केवळ सहा जागांवर समाधान मानावे लागले आहे.
सेलू पंचायत समितीतही भारतीय जनता पक्षाने १० पैकी आठ जागा जिंकून एकहाती वर्चस्व प्रस्थापित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केवळ दोन जागा मिळालेल्या आहेत. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचा जिंतूर आणि सेलू तालुक्यात करिष्मा दिसून आला आहे. गंगाखेड पंचायत समितीत भाजपने १४ पैकी नऊ जागा जिंकून एक हाती सत्ता मिळवली आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला चार जागांवर विजय मिळाला आहे, एक जागा अपक्षाकडे गेली आहे. पालम पंचायत समितीतसुद्धा भाजपने आठ पैकी सात जागा जिंकून एक हाती सत्ता प्रस्थापित केली आहे शिवसेना उबाठा गटाला केवळ एक जागा मिळाली आहे.

मानवत, सोनपेठ राष्ट्रवादीकडे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली मानवत पंचायत समितीमध्ये आठ पैकी सहा जागा जिंकून राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. शिवसेना शिंदे गटाला दोन जागा आहेत. सोनपेठ मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसने सहा पैकी पाच जागा जिंकून एक हाती वर्चस्व सिद्ध केले आहे.भाजपाला केवळ एक जागा मिळाली आहे.

परभणी, पूर्णा, पाथरीमध्ये त्रिशंकू स्थिती

परभणी पंचायत समितीत एकूण वीस जागांसाठी निवडणूक झाली. यामध्ये भारतीय जनता पार्टीचे चार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पाच आणि शिवसेना शिंदे गटाचेही चार उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसला चार, शिवसेना उबाठा दोन आणि एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी ठरला आहे. पाथरीमध्ये दहा पैकी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे चार उमेदवार, शिवसेना उबाठा तीन, काँग्रेस दोन आणि शिवसेना शिंदे गट यांचा एक उमेदवार विजयी झाला आहे. यामुळे पाथरीतही त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. पूर्णा पंचायत समितीमध्ये भाजपने एकूण १२ पैकी चार जागा जिंकल्या आहेत, तर शिवसेना उबाठा गटाला तीन, राष्ट्रवादी काँग्रेसला एक, यशवंत सेनेला दोन आणि दोन जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

भाजप आणि राष्ट्रवादीचाच बोलबाला :

परभणी जिल्ह्यातील पंचायत समितीच्या एकूण १०८ जागांपैकी ४७ जागांवर भारतीय जनता पक्षाचे, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ३३ उमेदवार विजयी झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या मिळून एकूण ८० उमेदवारांनी विजयश्री संपादन करीत आपापली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेना उबाठा पक्षाला नऊ, शिवसेना शिंदे गटाला सात, काँग्रेस सहा, यशवंत सेनेला दोन आणि चार जागी अपक्ष उमेदवार विजयी झाले आहे.

Post Views: 1,806
Please Share
Previous Post

परभणी झेडपीत भाजप सर्वात मोठा पक्ष

Next Post

सेलू तालुक्यात भाजपचा डंका

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुक्यात भाजपचा डंका

सेलू तालुक्यात भाजपचा डंका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ