देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शाळेशी नाळ कायम ठेवा : चैतन्य सरदेशपांडे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 10, 2026
in परभणी
0
शाळेशी नाळ कायम ठेवा : चैतन्य सरदेशपांडे
Please Share

सेलूतील नूतन कन्या प्रशालेचे स्नेहसंमेलन उत्साहात

सेलू : विद्यार्थिनींनो, तुमच्या प्रतिभेचा वटवृक्ष कितीही बहरला तरी आपल्या मातीला आणि आपल्या शाळेला कधीच विसरू नका. कायम शाळेच्या ऋणात रहा, शाळेशी नाळ कायम ठेवा, असे प्रतिपादन प्रसिद्ध नाट्यकलावंत चैतन्य धनंजय सरदेशपांडे यांनी केले.

नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचालित श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल उच्च माध्यमिक विभाग वार्षिक स्नेहसंमेलन २०२५-२६ अंतर्गत आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.सत्यनारायणजी लोया होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. व्ही. के. कोठेकर, मुख्याध्यापिका एन. डी. पाटील, उपमुख्याध्यापक पी. टी. कपाटे, पर्यवेक्षक डी. बी. घोगरे, सतीश कुंडीकर, कैलास मलवडे आणि माता पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष भारती खंदारे यांची विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. पूजा महाजन व संच यांनी स्वागतगीत सादर केले, त्यांना गिरीश दीक्षित यांनी तबला साथ केली. मुख्याध्यापिका निशा पाटील यांनी प्रास्ताविक केले, तर उपमुख्याध्यापक परशुराम कपाटे यांनी प्रशालेचा वार्षिक अहवाल सादर केला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे चैतन्य सरदेशपांडे यांचा शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि अमृतायन ग्रंथ देऊन सन्मान करण्यात आला.

या सोहळ्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील आदर्श विद्यार्थिनी म्हणून मैथिली अनिल गावंडे व मोगल वैष्णवी सुग्रीव यांचा गौरव करण्यात आला. तसेच लावन्य दीपक शेरे हिला कलारत्न पुरस्कार आणि फासाटे स्वाती मुंजाभाऊ हिचा उत्कृष्ट खेळाडू म्हणून स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. पाहुण्यांचा परिचय शशिकांत देशपांडे यांनी करून दिला.यावेळी एम.टी.एस., स्कॉलरशिप, एन. एम. एम. एस. परीक्षांसह राज्य व विभागीय क्रीडा स्पर्धांमधील यशस्वी विद्यार्थिनींना गौरविण्यात आले. कै. दुर्गाताई दत्तात्रय कुलकर्णी व नूतन कन्या प्रशाला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कथाकथन स्पर्धा, तसेच सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धांमधील विजेत्यांना बक्षीस वाटप करण्यात आले. बक्षीस पात्र विद्यार्थिनींच्या यादीचे वाचन दतराव घोगरे, उपेंद्र दिवाळकर, यमुना चव्हाण, किशोर ढोके, सीमा सुकते, सुरेखा भांबळे, अमृता नरके, सपना पाटणी, पंडित जाधव आणि ज्योती कुंभकर्ण यांनी केले.

अध्यक्षीय समारोप डॉ. सत्यनारायणजी लोया यांनी केला. सूत्रसंचालन लावण्या शेरे, माधुरी जोशी, रेणुका अंबेकर व कीर्ती राऊत यांनी केले, तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख भालचंद्र गांजापुरकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विद्यार्थिनी, पालक, निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,717
Please Share
Previous Post

सेलू तालुक्यात भाजपचा डंका

Next Post

क्रुझरच्या अपघातात १३ वर्‍हाडी जखमी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
क्रुझरच्या अपघातात १३ वर्‍हाडी जखमी

क्रुझरच्या अपघातात १३ वर्‍हाडी जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या...

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
0

परभणी : अलमट्टी कझाकस्तान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाकडून घेण्यात येणाऱ्या आशियाई ऑलिंपिकची आशा या स्पर्धेमध्ये परभणीच्या आद्य...

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ