देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

५६९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 17, 2026
in परभणी
0
५६९ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर
Please Share

जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ तर परभणीत ८८ ग्रामपंचायतींचा समावेश, मे महिन्यापर्यंत चालणार प्रभाग रचनेची प्रक्रिया

परभणी/प्रतिनिधी : माहे जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ग्रामविकास विभागाने १७ फेब्रुवारी रोजी प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमामुळे परभणी जिल्ह्यातील ५६९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून राजकीय क्षेत्रात मोठ्या हालचालींना वेग आला आहे.

जिल्ह्यातील तालुकावार ग्रामपंचायतींच्या संख्येनुसार जिंतूर तालुक्यात सर्वाधिक १०१ ग्रामपंचायती आहेत. त्याखालोखाल परभणी तालुक्यात ८८, गंगाखेड ७१, सेलू ६७, पूर्णा ६५, पालम ५३, पाथरी ४२ आणि मानवत व सोनपेठमध्ये प्रत्येकी ४१ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामविकास मंत्रालयाने राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार या प्रभाग रचनेच्या कार्यवाहीला सुरुवात केली आहे.निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसार संबंधित तहसीलदारांना २० फेब्रुवारीपर्यंत गुगल अर्थचे नकाशे अंतिम करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर तलाठी आणि ग्रामसेवकांनी संयुक्त स्थळ पाहणी करून २७ फेब्रुवारीपर्यंत प्रभाग व त्यांच्या सीमा निश्चित करायच्या आहेत. ५ मार्चपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेची तपासणी तहसीलदारांच्या समितीमार्फत केली जाईल. उपविभागीय अधिकारी ११ मार्चपर्यंत हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करतील आणि जिल्हाधिकारी १७ मार्चपर्यंत संक्षिप्त तपासणी करून तो प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेसाठी पाठवतील.निवडणूक आयोगाने २३ मार्चपर्यंत प्रस्तावांना मान्यता दिल्यानंतर ३० मार्चपर्यंत प्रभाग रचनेचे काम पूर्ण केले जाईल. या प्रक्रियेत नागरिकांच्या हरकती व सूचना मागवण्यासाठी ७ एप्रिल रोजी जाहीर सूचना प्रसिद्ध केली जाईल. १३ एप्रिलपर्यंत हरकती स्वीकारून २१ एप्रिलपर्यंत त्यावर सुनावणी घेतली जाईल. अखेर २८ एप्रिल रोजी प्रभाग रचना अंतिम करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल आणि ४ मे रोजी जिल्हाधिकारी या अंतिम प्रभाग रचनेला अधिकृत मान्यता देतील. या सविस्तर कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाचा मार्ग मोकळा होणार असल्याने ग्रामीण भागातील इच्छुकांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.

Post Views: 1,663
Please Share
Previous Post

महानिर्यात इग्नाईट कन्व्हेंशन कार्यशाळा उत्साहात

Next Post

वालूरच्या जिप मराठी शाळेत ‘आनंदनगरी’

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वालूरच्या जिप मराठी शाळेत 'आनंदनगरी'

वालूरच्या जिप मराठी शाळेत 'आनंदनगरी'

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ