देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वालूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 21, 2026
in परभणी
0
वालूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा
Please Share

भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, सेलू-वालूर फाट्याजवळील घटना

सेलू जि.परभणी : सेलू ते परभणी महामार्गावरील वालूर जोड रस्त्यावर शनिवारी, २१ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहप्रवासी गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रखमाजी नामदेव थोरात (वय ५५ वर्ष, रा. डुघरा) हे आपल्या दुचाकीने (एम.एच. २२ ए.एन. ९७५५) जात असताना हायवा ट्रकने (एम.एच. ०९ बी.एन. ८४३३) त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रखमाजी थोरात हे ट्रकच्या मागील चाकाखाली आले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर असलेले सहप्रवासी बबन कचरू सिरसाट (वय ४९ वर्ष, रा. कुपटा) हे देखील गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. सेलू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी बबन सिरसाट यांना उपचारासाठी सेलू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातग्रस्त दोन्ही वाहने पुढील तपासासाठी सेलू पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून, पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी दिली.

वालूर रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा

सेलू ते वालूर रस्ता चांगला झाल्यापासून वाहने भरधाव धावत आहेत. यामध्ये गौण खनिजाचे ट्रॅक्टर, हायवा, तसेच क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि दुचाकी, चारचाकी वाहनांचा समावेश होतो. थोडीशी चूक अपघातास कारणीभूत ठरून नाहक बळी जाऊन संसार उघड्यावर येत आहेत. दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत चालल्याने हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. वाहन चालकांनी खबरदारी घेण्याची आणि सावध वाहने चालविण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.

Post Views: 1,627
Please Share
Previous Post

शिवराय हे सर्वसमावेशक लोकराजे : श्यामसुंदर महाराज सोन्नर

Next Post

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त परिसर स्वच्छता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ