देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पंधरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकळाच

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 24, 2026
in परभणी
0
पंधरा दिवस उलटूनही मुख्य आरोपी मोकळाच
Please Share

पाथरी येथील प्राणघातक हल्ला प्रकरण : पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; आरोपीला अटक करण्याची नागरिकांची मागणी

परभणी : महाराष्ट्र पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पाथरी येथील एका घटनेमुळे मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासकीय परिसरात एका कर्मचाऱ्याच्या सहकाऱ्यावर भरदिवसा प्राणघातक हल्ला होऊन पंधरा दिवस उलटले, तरी मुख्य आरोपी अद्याप मोकळाच फिरत आहे. पाथरी पोलिसांच्या या भूमिकेमुळे आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी शारेफ खान रफिकखान पठाण हे पाथरी नगर परिषदेत अग्निशमन विभागात कार्यरत आहेत. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी ते आपल्या सहकाऱ्यासोबत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी गेले होते. याच वेळी आरोपी हबीबखान हमीदखान पठाण याने तिथे येऊन जुन्या वादातून फिर्यादीच्या सहकाऱ्याशी हुज्जत घातली.वादाचे रूपांतर मोठ्या भांडणात झाले आणि आरोपीने जिवे मारण्याची धमकी देऊन खुर्रमखान पठाण यांच्या पोटावर चाकूने वार केले. या हल्ल्यात खुर्रमखान गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर परभणी येथील रुग्णालयात गेल्या पंधरा दिवसांपासून उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण पाथरी शहरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०९ आणि ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र, इतका गंभीर गुन्हा घडूनही आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला आहे. शासकीय परिसरात असा हल्ला होणे आणि आरोपी अद्याप न पकडला जाणे, हे पाथरी पोलिसांचे मोठे अपयश मानले जात आहे. जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसेल, तर सर्वसामान्यांनी सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Post Views: 1,646
Please Share
Previous Post

वीरशैव लिंगायत स्मशानभूमीची दयनीय अवस्था

Next Post

राष्ट्रसंत गाडगे महाराज विवेक जागृतीचे ऊर्जास्रोत

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रसंत गाडगे महाराज विवेक जागृतीचे ऊर्जास्रोत

राष्ट्रसंत गाडगे महाराज विवेक जागृतीचे ऊर्जास्रोत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ