देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
ऐतिहासिक वारसा जतन : वालूरच्या सर्पिलाकार बारवेचे पुनरुज्जीवन कार्य सुरू
Please Share

सेवावर्धिनी संस्थेचा पुढाकार; देगलूर येथून विशेष दगड

सेलू : देशपातळीवर चर्चेत आलेल्या सेलू (जि. परभणी) तालुक्यातील वालूर येथील सर्पिलाकार बारवेच्या (हेलिकल स्टेपवेल) जतन व संवर्धनाचे काम पुणे येथील सेवावर्धिनी संस्थेने हाती घेतले आहे. ही संस्था मराठवाड्यातील दुष्काळी भागात जलसंवर्धनाची कामे करणार असून वालूर येथील बारवांचे संवर्धन व सुशोभिकरण हा त्याचाच एक भाग आहे. संवर्धनाचे काम तीन टप्प्यात होत असून बांधकामासाठी खास देगलूर येथून दगड मागविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यातील काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले आहे.

कुठलाही गवगवा न करता विकास कामाचा शुभारंभ सरपंच संजय साडेगांवकर, गणेशराव मुंडे, शैलेश तोष्णीवाल, मारोतराव बोडखे, वाल्मिक दराडे, गोपाळ अबूज, गणेशराव खरबे, बाजीराव बोडखे आणि राजेश साडेगांवकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला. शिल्पकारांची टीम वालूरमध्ये दाखल झाली आहे.१९९८ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली सेवावर्धिनी ही संस्था समाजातील दुर्बल घटकांना सबल करून मुख्य प्रवाहात आणण्याचे कामे, समाजाच्या गरजेची कामे करते. यातील कोणत्याही कामासाठी सेवावर्धिनी शासनाकडून व शासनाच्या कोणत्याही अभिकरणाकडून कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत घेत नाही. वेगवेगळ्या कंपन्यांच्या आर्थिक सहाय्यावर अशी कामे केली जातात.पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तिसऱ्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने “अहिल्याबाई होळकर बारव पुनरुज्जीवन प्रकल्प” सेवावर्धिनी राबवित आहे. या प्रकल्पांतर्गत सध्या पश्चिम महाराष्ट्रातील १७ बारवांचे जतन संवर्धन करण्यात आले आहे. वालूरच्या निमित्ताने संस्थेने आपले कार्यक्षेत्र विस्तारित केले आहे.

पोस्टखात्याने टपाल तिकीट काढून सन्मानित केलेल्या वालूरच्या बारदानी बारवेचेही काम लागोलाग सुरू होणार आहे. हेलिकल स्टेपवेलचा लोकार्पण सोहळा दिवाळीपूर्वी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीत होणार असून जलपूजन राष्ट्रसंत स्वामी गोविंद देव गिरि महाराज (किशोरजी व्यास) यांच्या हस्ते होणार आहे.परभणी तालुक्यातील आर्वी व सेलू तालुक्यातील रायपूर येथील प्राचीन बारवांच्या पुनर्निर्माणाचे प्रस्ताव संस्थेकडे दाखल करण्यात आले असून रायपूर येथील प्रस्तावाला संस्थेने मान्यता दिली असल्याची माहिती शासनाच्या बारव संवर्धन समितीचे सदस्य तथा समन्वयक मल्हारिकांत देशमुख यांनी दिली.

Post Views: 1,645
Please Share
Previous Post

आद्या बाहेतीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत कांस्य पदक

Next Post

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

हायवेवरील नालीचा रपटा कोसळला; अपघाताचा धोका वाढला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ