देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 3, 2026
in परभणी
0
पारंपरिक मातीस्नानाने धुलिवंदन उत्साहात
Please Share

सेलूतील गांधी प्राकृतिक चिकित्सा आणि योग मंडळाची २० वर्षांची परंपरा, गीत संगीताच्या कार्यक्रमालाही प्रतिसाद

सेलू जि.परभणी : परभणी जिल्ह्यातील सेलू येथे गांधी प्राकृतिक चिकित्सा एवं योग मंडळ व श्रीरामजी भांगडिया रुग्णसेवा मंडळ यांच्या वतीने होळीनिमित्त मंगळवारी, ३ मार्च २०२६ रोजी आयोजित पारंपरिक मातीस्नानाने धुलीवंदन उत्साहात साजरे करण्यात आले.

उपक्रमाचे हे विसावे वर्ष होते. सेलू येथील चंद्रप्रकाश सांगतांनी व गंगाधर शेरे पाटील यांच्या शेतात धुलिवंदनानिमित्त मातीस्नानाचा उपक्रम सुरू झाला. मागील तीन वर्षांपासून मंठा रोडवरील मालाणी यांच्या शेतातील हॉटेल परिवार फार्म व ॲग्रो टुरिझम परिसरात संयोजक शिवनारायण मालाणी यांच्या मार्गदर्शनाखाली मातीस्नानाचे आयोजन करण्यात येत आहे. या वर्षी मातीस्नानानंतर कडधान्यमिश्रित उसळ, आर्युवेदिक काढा घेण्याची परंपरा जपण्यात आली. शिवनारायण मालाणी, हितेश शहा, रेवा कुंदनानी, प्रवीण माणकेश्वर, आनंद बाहेती, वल्लभ राठी, सतीश जाधव, रोहित काला, भास्करराव घोडके, कैलासराव काळे, श्रीपाद रोडगे, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर, सुनील गायकवाड, बाबासाहेब हेलसकर, कृष्णा काटे, वाल्मिक घाडगे (परतूर), डिगांबर डोंबे, राम सुरवसे, रामकिशन कटारे, सुभाष मोहकरे, प्रेमगोपाल कासट (मंठा) आदींसह अनेकांनी तसेच आरोही ढवळे, स्वराज जाधव, राघव व श्लोक काटे या चिमुकल्यांसह अनेकांनी उत्साहाने माती स्नानाचा आनंद घेतला. यानिमित्ताने आयोजित गीत संगीताच्या कार्यक्रमात कृष्णा काटे, डॉ.विलास मोरे, गंगाधर कान्हेकर, वाल्मिक घाडगे यांनी बहारदार गीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. गणेश सिंग, विष्णू, करण सिंग, यश आचलिया आदी उपस्थित होते.

मृदास्नानाला आयुर्वेदात अतिशय महत्त्व आहे. तीळ तेलाने मालिश केल्यानंतर मातीचा लेप शरीरावर लावण्यात येतो. तासभर उन्हात बसून सुकवला जातो. त्यानंतर सचैलस्नान केले जाते. ऋतुचक्राप्रमाणे शरीराला मातीस्नान उपकारक ठरणार आहे, अशी माहिती संयोजक शिवनारायण मालाणी यांनी या वेळी दिली.

Post Views: 1,809
Please Share
Previous Post

ज्ञानसाधना प्रतिष्ठानमध्ये विज्ञान प्रदर्शनाला प्रतिसाद

Next Post

सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश

सेलूच्या शिवराज सूर्यवंशीचे प्रेरणादायी यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्राला पाच वर्षाचा कारावास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

मंगरूळपीर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल देशनिष्ठ प्रतिनिधी, मंगरूळपीर : देपूळ ता. वाशिम येथील एका महिलेसह तिच्या नातवाला जुन्या...

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 4, 2026
0

आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या उपस्थितीत २० हून अधिक तंत्रज्ञांचा प्रवेश परभणी : आमदार डॉ. राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास...

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ