सेलू : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भाजप महिला आघाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू आणि श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी व महिला उद्योजकता शिबीर तसेच महिला सन्मान सोहळा रविवार, ८ मार्च २०२६ रोजी श्री साईबाबा मंदिर, महेश नगर, सेलू येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षा डॉ. मिना परतानी आणि भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण जिल्हाध्यक्षा सारीका पाखरे आणि महानगर जिल्हाध्यक्षा मनिषा जाधव राहणार आहेत.सेलू शहरातील महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी महिला मजूर व कृषी अवजारे तज्ज्ञ डॉ. जयश्री सरकटे आणि शेतकरी महिला मार्गदर्शन तज्ज्ञ प्रा.डॉ. अश्विनी चव्हाण यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन भाजप महिला आघाडी, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूचे सभापती डॉ. संजय रोडगे आणि श्रीराम प्रतिष्ठानच्या अध्यक्षा व जिल्हा परिषद सदस्या डॉ. सविता रोडगे यांच्या वतीने करण्यात आले आहे.सेलू तालुक्यातील आणि जिल्ह्यातील सर्व महिला सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सोसायटी सदस्यांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महिलांचा होणार सन्मान
या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक व राजकीय दृष्ट्या नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिका सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर परिषद सदस्य, महिला सरपंच आणि कृषी उद्योजक महिलांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे.





