देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यास सर्व मदत करू

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
March 7, 2026
in परभणी
0
Please Share

हभप अच्युत महाराज दस्तापूरकर : परभणी येथील पंचमुखी हनुमान मंदिरात बैठक संपन्न

परभणी : सेलू येथे पंडित महाराज डाके यांच्या नेतृत्वात आयोजित केलेल्या फिरत्या ज्ञानेश्वरी महापारायण सोहळ्यासाठी सर्व प्रकारची मदत करू, असे वचन अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी शनिवारी (दि.७) एका बैठकीत बोलताना दिले.

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन सोहळ्याच्या निमित्ताने मागच्या पाच वर्षापासून पंडित महाराज डाके परभणी जिल्ह्यात विविध ठिकाणी अखंड फिरता ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करत आहेत. या पारायण सोहळ्याची सेलू तालुक्यातील सांगता दि.११ ते १९ मार्च या दरम्यान सातोना रोड सेलू येथे होणार आहे. या भव्य पारायण सोहळ्याच्या सूक्ष्म नियोजनाच्या संदर्भात शनिवारी (दि.७) पंडित महाराज डाके हे परभणी शहरात आले होते. त्यानिमित्त पंचमुखी हनुमान मंदिर, गव्हाणे चौक परभणी येथे झालेल्या बैठकीस अच्युत महाराज दस्तापूरकर, माधवबुवा आजेगावकर, वेदशास्त्र संपन्न बाळू गुरु आसोलेकर, सूर्यकांत पागोटे महाराज, नरहरी गुरु जोशी एरंडेश्वरकर, पंडीत महाराज डाके यांची प्रमुख उपस्थिती होती.
अच्युत महाराज दस्तापूरकर यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. स्वामी विवेकानंद तसेच शीख धर्मातील परंपरेचे उदाहरण देत ग्रंथ हेच गुरु असल्याचे स्पष्ट केले. पंडित महाराज डाके यांनी आजवर २०० गावांमध्ये श्री ज्ञानेश्वरी पारायणे केली असून त्यांच्या रूपाने वारकरी संप्रदायाला नवं नेतृत्व मिळाल्याची भावनादेखील त्यांनी व्यक्त केली. हभप डाके महाराज यांनी फिरता पारायण सोहळा ही श्री ज्ञानेश्वरी ग्रंथासाठी केलेली उपासना असून यासाठी सर्वच जण कष्ट घेतात असे सांगितले. शेतकरी पूत्र गावोगावी जाऊन प्रचारक बनून लोकांना या उपक्रमात सहभागी होण्यास सांगतात. लोकसहभागातून ही एक प्रकारची धार्मिक चळवळ बनत आहे. प्लास्टिक न वापरता स्टीलच्या वाट्या व पेले आणि केळीच्या पानांचा महाप्रसादासाठी वापर केला जातो. हे काम अच्युत महाराजांनी पुढे न्यावे अशी विनंती त्यांनी यावेळी केली.
यावेळी आजेगावकर, जोशी महाराज, आसोलेकर, पागोटे महाराज यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ॲड.रमेशराव दुधाटे गोळेगावकर यांनी केले. वारकरी संप्रदायात परभणी जिल्ह्याचे मोठे योगदान असून गावागावातून संत परंपरेचा वारसा आजही जपला जात आहे. आज तरुणाई वाचनापासून, संत संगतीपासून दूर गेल्याने आज समाजाला दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. अशा स्थितीत पंडित महाराज डाके यांनी सुरू केलेला फिरता पारायण सोहळा हा एक चांगला उपक्रम असून तो टप्प्याटप्प्याने मराठवाडा व महाराष्ट्रात नेण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन डॉ.शेखर देशमुख यांनी केले. शशीकला बंडे यांनी सादर केलेल्या पसायदानाने बैठकीची सांगता झाली. यावेळी रमेश महाराज मोरे, रामप्रसाद महाराज चव्हाण, ओम महाराज आगे, डॉ.केदार खटिंग, डॉ.रामेश्वर नाईक, राजेंद्र पोकर्णा, ॲड.न. चिं.जाधव, स्वप्नील पत्तेवार,नंदकिशोर डोंबे, राजाभाऊ मुंडे, अनिल देशमुख, ॲड.दीपकराव देशमुख, प्रा.डॉ. चिताडे, ॲड.राजकुमार भांबरे आदी उपस्थित होते.

Post Views: 95
Please Share
Previous Post

महिलांनी हक्कांप्रती जागरूक राहावे

Next Post

सेलूत आरोग्य तपासणी व महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत आरोग्य तपासणी व महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन

सेलूत आरोग्य तपासणी व महिला सन्मान सोहळ्याचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ