परभणी : ज्ञानसाधना प्रतिष्ठान, परभणी संचलित ज्ञानसाधना नीट आणि जेईई फाउंडेशनच्या वतीने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शन या विषयावर २८ मार्च रोजी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधींबाबत योग्य दिशा देण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रियेतील बारकावे समजावून सांगण्यासाठी या विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी सुनील गोविंदपुरकर आणि केतन ढोके (लातूर) यांनी प्रमुख व्याख्याते म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी जेईई व सीईटी परीक्षांची तयारी, अभ्यास पद्धती, प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्पे, तांत्रिक अडचणी तसेच करिअर निवडीतील महत्त्वाचे मुद्दे यावर सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक आर. एन. इतबारे यांनी केले. अध्यक्षस्थानी ज्ञानसाधना प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. किरण सोनटक्के होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव प्रा. शितल सोनटक्के यांची उपस्थिती होती. याप्रसंगी विभाग प्रमुख एस. डी. धुळे, प्रा. आर. एन. इतबारे, शरद कणकापुरे, विशाल पोले आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन के. डी. शिंदे यांनी केले, तर प्रा. दीपक घुगे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





