देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 30, 2026
in महाराष्ट्र
0
साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव
Please Share

आपत्कालीन प्रणालीतील योगदानाबद्दल विविध संघटनांकडून गौरवपूर्ण सन्मान

सेलू : येथील साक्षी श्रीपाद कुलकर्णी-मसलेकर यांनी केंद्र शासनाच्या आपत्कालीन सूचना प्रणालीच्या निर्मितीमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाने सेलूचे नाव देशपातळीवर झळकले आहे. या बद्दल शुक्रवारी, २९ मे रोजी शहरातील विविध शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक संघटना, पत्रकार संघ आणि महिला मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.

स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालयाच्या वाचन कक्षात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मिलिंद सावंत होते. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर आणि मान्यवरांच्या हस्ते साक्षी यांचा सन्मान करण्यात आला. साक्षी यांचे आजी-आजोबा इंदुमती व भास्करराव कुलकर्णी, आई-वडील श्रद्धा व श्रीपाद कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कमी वयात देशपातळीवर सेलूचा नावलौकिक वाढविल्याबद्दल उपस्थितांनी साक्षीवर अभिनंदनाचा वर्षाव केला. नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील आणि साक्षीचे काका चंद्रकांत कुलकर्णी यांनी मनोगतातून भरभरून कौतुक करित शुभेच्छा दिल्या.

प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर म्हणाले की, “मुली कुठेही कमी नाहीत, हे साक्षीने आपल्या बुद्धिमत्ता, अभ्यास आणि कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. गंगामसला या छोट्याशा ग्रामीण भागापासून ते दिल्लीपर्यंतचा साक्षीचा प्रवास आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.” नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांनी साक्षीला भविष्यासाठी शुभेच्छा देताना सांगितले की, “साक्षीने यापुढे इस्रो आणि नासासारख्या जागतिक संस्थांमध्ये जाऊन काम करावे आणि जीवनातील सर्व यशोशिखरे गाठावीत.”

प्रास्ताविक प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी केले. सुभाष मोहकरे यांनी आभार मानले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, महेशराव खारकर, उपेन्द्र बेलूलकर, विजय चौधरी, मनिष कदम, ज्येष्ठ पत्रकार नारायणराव पाटील, शिवनारायण मालाणी, गणेश माळवे, पुनमचंद खोना, विजया कोठेकर, ललिता गिल्डा, वसुधा खारकर, डॉ. भाग्यश्री धामणगावकर, सुनिल गायकवाड, माधव गव्हाणे, नारायण इक्कर, वल्लभ लोया, दत्तात्रय माकोडे यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे समन्वयक डॉ. सुरेश हिवाळे, डॉ. शरद ठाकर आणि विविध संघटनांच्या सदस्यांनी पुढाकार घेतला.

विविध संस्थांनी केला गौरव

नूतन विद्यालय शिक्षण संस्था, स्वामी रामानंद तीर्थ हिंदी-मराठी ग्रंथालय, नूतन विद्यालय, शब्दसह्याद्री व अक्षर प्रतिष्ठान, शारदा विद्यालय, विवेकानंद शैक्षणिक संकुल, जनुभाऊ रानडे व्याख्यानमाला, पत्रकार संघ, व्हाईस ऑफ मिडीया, सेलू नागरी सहकारी पतसंस्था, टेबल टेनिस असोसिएशन (महाराष्ट्र), पेंशनर्स असोसिएशन, महिला मंडळ (सेलू), मॉर्निंग ग्रुप, नवचेतना प्रतिष्ठान, नूतन महाविद्यालय, शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुख शिक्षण परिषद, रेल्वे प्रवासी संघ आणि श्री शंकरलिंग मंदिर देवस्थान या संस्थांच्या वतीने साक्षी कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

Post Views: 1,436
Please Share
Previous Post

डॉ.शिवाजी शिंदे यांना ‘भारत गौरव प्रतिभा रत्न’ पुरस्कार

Next Post

अहिल्यादेवी होळकर यांना ‘स्वाराती’ ग्रंथालयात अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अहिल्यादेवी होळकर यांना ‘स्वाराती’ ग्रंथालयात अभिवादन

अहिल्यादेवी होळकर यांना 'स्वाराती' ग्रंथालयात अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

सेवागौरवानिमित्त शाळेसाठी ५० हजारांची देणगी

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक चव्हाण यांचा सेवाभाव सेलू : येथील कै. राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयातील कलाध्यापक रोहीदास वाच्छू चव्हाण...

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

‘गाव तिथे ग्राहक पंचायत’ अभियान प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ परभणी | प्रतिनिधी : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या देवगिरी प्रांतात...

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

सौरभ माळवे यांची राज्यकर निरीक्षक पदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

सेलू : येथील ज्येष्ठ क्रीडा शिक्षक पर्यवेक्षक गणेश माळवे यांचे सुपुत्र, नूतन विद्यालयाचा राष्ट्रीय सॉफ्टबॉल खेळाडू सौरभ माळवे यांची मुंबई...

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

सेलूत केश प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 2, 2026
0

विरळ केस झालेल्या रुग्णांना मोठा दिलासा सेलू : येथील मायस्कीन हॉस्पिटलचे संचालक व त्वचाविकारतज्ज्ञ डॉ. शैलेश मालाणी आणि हैदराबाद येथील...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ