देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

अहिल्यादेवी होळकर यांना ‘स्वाराती’ ग्रंथालयात अभिवादन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 31, 2026
in मराठवाडा
0
अहिल्यादेवी होळकर यांना ‘स्वाराती’ ग्रंथालयात अभिवादन
Please Share

वैचारिक, सामाजिक आणि करुणेचा त्रिवेणी संगम म्हणजे अहिल्याबाई होळकर : प्रा. दादासाहेब बोंबले

सेलू (प्रतिनिधी) : अहिल्याबाई होळकर यांच्या कार्यात वैचारिक स्पष्टता, सामाजिक बांधिलकी आणि करुणा दिसून येते. दुष्काळ, सामाजिक अन्याय, स्त्रियांची तत्कालीन व्यवस्था आणि दलितांचे दुःख याविषयी त्यांनी व्यक्त केलेली चिंता त्या काळातील संवेदनशील समाजसुधारकाचे दर्शन घडवते. त्यांचे विचार हा त्या काळाचा सामाजिक आरसा असून त्यातून प्रखर मानवतावाद स्पष्टपणे व्यक्त होतो, असे प्रतिपादन प्रा. दादासाहेब बोंबले यांनी केले.

सेलू येथील स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात राजमाता लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.पुढे बोलताना प्रा. बोंबले म्हणाले की, शिक्षणाचे महत्त्व, स्त्री-पुरुष समानता, अज्ञानाविरुद्धचा संघर्ष, श्रमाचे मोल आणि आत्मसन्मान यासारख्या विषयांवर अहिल्याबाईंनी प्रभावी आणि थेट भाषेत आपले मत मांडले. त्या वंचित बहुजन आणि स्त्री घटकांचे दुःख नेहमी दृष्टिगोचर करीत असत. अहिल्याबाईंचे चरित्र वाचले तर हृदय पिळवटून आल्याशिवाय राहत नाही, एवढ्या हळव्या आणि संवेदनशील मनाच्या त्या होत्या.या वेळी प्रा. के. डी. वाघमारे यांनी देखील अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनप्रवासातील विविध प्रेरक प्रसंग उपस्थितांसमोर मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. अनंत मोगल यांनी केले, तर आभार माधव गव्हाणे यांनी मानले. या अभिवादन कार्यक्रमास डॉ. शरद ठाकर, रेवणआप्पा साळेगावकर, यशवंत वजीर, संपतराव झोडगावकर, रामचंद्र गजमल आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post Views: 1,503
Please Share
Previous Post

साक्षी कुलकर्णी यांनी झळकावले सेलूचे नाव

Next Post

ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा

ठेकेदाराकडून पाण्याचा बेसुमार उपसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा...

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१०० कोटी नामजप संकल्पांतर्गत आयोजन सेलू : शहरातील ब्राम्हण गल्ली येथील श्री दत्त मंदिरात २ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते...

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

राज्य योगासन स्पर्धेसाठी २५ खेळाडूंची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

सेलूत जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेला मोठा प्रतिसाद सेलू : महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनच्या मान्यतेने आणि योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणीच्या वतीने जिल्हास्तरीय...

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

श्रीक्षेत्र वालूर येथे ‘श्रीज्ञानेश्वरी चिंतन’ सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
0

१३ ऑगस्टपासून दररोज रात्री ९ वाजता कार्यक्रमाचे आयोजन वालूर | प्रतिनिधी : सद्गुरु श्रीधुंडामाराज देगलूरकर वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने चातुर्मास्य...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ