देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 12, 2026
in परभणी
0
सेलूत ‘श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ’ सोहळा
Please Share

श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने १३ ते १९ जूनपर्यंत आयोजन, धाराशिवचे श्रीपद्मनाभ महाराज व्यास करणार कथा निरूपण

सेलू : येथील श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या वतीने पुरुषोत्तम मासानिमित्त महेशनगर, सेलू (जि. परभणी) येथील ‘भक्तीतीर्थ’ श्रीसाई मंदिरात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार,१३ जून ते शुक्रवार, १९ जून २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

श्रीमद्भागवत हे भगवंताचे प्रत्यक्ष वाङ्मयमूर्ती स्वरूप मानले जाते. त्यामुळे या पवित्र पुरुषोत्तम मासात भागवत कथेच्या श्रवणाचा लाभ भाविकांना मिळावा या उद्देशाने हे आयोजन केले आहे. या महोत्सवात कथा प्रवक्ता म्हणून वेदमूर्ती शास्त्रसंपन्न संत हभप श्रीपद्मनाभ महाराज व्यास (धाराशिव) हे आपल्या रसाळ वाणीतून कथेचे निरूपण करणार आहेत. कथेची वेळ दररोज दुपारी ३ ते ६ अशी असेल. या ज्ञानयज्ञाची सांगता शुक्रवार, १९ जून २०२६ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत कथासमाप्तीने होईल. १९ जूनरोजी सकाळी ७.३० वाजता भव्य ग्रंथदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी श्री केशवराज बाबासाहेब मंदिर ते कथास्थळ अशी काढण्यात येईल. कथासमाप्तीनंतर दुपारी ४.३० वाजेपर्यंत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. या भक्तीमय वातावरणात सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्रवणानंदाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमती वसुधा मनोहरराव कुलकर्णी, मीना व शशिकांत सोनाजीपंत कुलकर्णी, सुनंदा व शरद सोनाजीपंत कुलकर्णी, वैशाली व राहुल शशिकांत कुलकर्णी, दीप्ती व अतुल शरदराव कुलकर्णी तसेच इशिता, शाश्वत व कुलकर्णी परिवाराने केले आहे.

“श्रीमद्भागवत हे भगवंताचे प्रत्यक्ष वाङ्मय स्वरूप आहे. कलियुगात भगवंताच्या या कथेचे श्रवण करणे हेच सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. सेलू आणि परिसरातील समस्त भाविकांनी लाभ घेऊन आपले जीवन धन्य करावे.” – प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आणि परिवार, सेलू (आयोजक)

Post Views: 1,507
Please Share
Previous Post

लॉयन्स क्लबच्या शिबिरात ८५ रुग्णांची नेत्र तपासणी

Next Post

सेलू मतदार यादीतील बोगस नावे वगळा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू मतदार यादीतील बोगस नावे वगळा

सेलू मतदार यादीतील बोगस नावे वगळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ