देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

वादळी वाऱ्याने स्वप्नांचा केला चुराडा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 14, 2026
in परभणी
0
वादळी वाऱ्याने स्वप्नांचा केला चुराडा
Please Share

हाताशी आलेले केळीचे पीक उद्ध्वस्त, पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकऱ्याचा आक्रोश; शासनाकडे मदतीची मागणी

पाथरी, दि. १४ : पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील तरुण शेतकरी राजेश माणिकराव घुंबरे यांच्या केळीच्या बागेचे वादळी वाऱ्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे. १२ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास झालेल्या प्रचंड वादळ आणि विजांच्या कडकडाटासह कोसळलेल्या पावसाने हाताशी आलेले केळीचे पीक काही क्षणांत भुईसपाट केले. यात शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

केळी हे नगदी पीक असल्याने राजेश यांनी वर्षभर रात्रंदिवस काबाडकष्ट करून ही बाग फुलवली होती. यंदा बाजारात केळीला चांगला भाव असल्याने बँक कर्ज फिटेल आणि मुलांच्या शिक्षणासह कुटुंबाच्या अडचणी दूर होतील, अशी आशा त्यांना होती. मात्र, पीक कापणीच्या अगदी काही दिवस आधी निसर्गाने घाला घातला. वादळामुळे फळांनी लगडलेली झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर तयार झालेले घड चिखलात मिसळले.

या परिसरात केळीसोबतच पपई आणि भाजीपाल्याचेही मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्याने शासनाकडे मदतीची याचना केली आहे. शासनाने आणि पीकविमा कंपन्यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. एक वर्षाची मेहनत डोळ्यादेखत मातीमोल झाल्याने संबंधित शेतकरी सध्या अत्यंत हतबल झाला आहे.

“हे फक्त आर्थिक नुकसान नाही, माझ्या स्वप्नांची राख झाली” उध्वस्त झालेल्या बागेकडे पाहत राजेश ढसाढसा रडत म्हणाले, “वादळी वाऱ्यामुळे झालेले केळी पिकाचे नुकसान हे केवळ आर्थिक नुकसान नसून माझ्या वर्षभराच्या परिश्रमांचे आणि स्वप्नांचे नुकसान आहे. एका क्षणात सगळं संपलं. आता कर्ज कसं फेडायचं? मुलांच्या तोंडाला काय घास भरवायचा? हा प्रश्न मला खातोय.”

Post Views: 1,261
Please Share
Previous Post

जिल्हाधिकाऱ्यांनी घालून दिला बदल्यांचा नवा आदर्श

Next Post

सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा

सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

श्रीमद्भागवत कथेची भक्तीमय सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

सेलूमध्ये ग्रंथ दिंडी, सजीव देखाव्यांनी वेधले लक्ष, भाविकांची मोठी उपस्थिती सेलू जि.परभणी : पुरूषोत्तम मासानिमित्त श्रीसोनामाय प्रतिष्ठान आणि कुलकर्णी परिवाराच्या...

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

चोरट्यांचा धुमाकूळ : पालममध्ये एकाच रात्री तीन दुकाने फोडली

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

पोलिसांची गस्त सुरू असतानाच चोरी; फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि डॉग स्क्वॉड पाचारण पालम : शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी दुकाने...

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणूक; निवडणूक निरीक्षकांकडून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी परभणी : महाराष्ट्र विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकार मतदारसंघ निवडणुकीची...

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
0

आरती शेळके, वैष्णवी कुबडे सर्वप्रथम; प्रवेश प्रक्रिया सुरू परभणी : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबईच्या वतीने घेण्यात आलेल्या औषधनिर्माणशास्त्र...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ