देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 15, 2026
in परभणी
0
सेलूत खत विक्री केंद्रांवर विशेष पथके; तीन केंद्रांना नोटिसा
Please Share

गटविकास अधिकारी उदय जाधव यांची माहिती, मासिक सभेतील चर्चेनंतर निर्णय

सेलू /परभणी : पंचायत समिती सेलूच्या मासिक सभेत खत विक्री केंद्रांवरील शेतकऱ्यांच्या तक्रारी, एमआरपीपेक्षा अधिक दराने खत विक्री तसेच लिंकिंगसारख्या प्रकारांबाबत सदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ पावले उचलली आहेत. त्यानुसार खरीप हंगाम २०२६-२७ दरम्यान कृषी निविष्ठा विक्री केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हा परिषद गटनिहाय तसेच सेलू शहरासाठी स्वतंत्र विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. गटविकास अधिकारी उदय जाधव यांनी ही माहिती दिली.

यावर्षी विविध खतांच्या दरांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर काही विक्री केंद्रांमध्ये नमूद कमाल किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने विक्री तसेच इतर वस्तूंची सक्तीची विक्री (लिंकिंग) होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने पंचायत समिती प्रशासनाने विशेष देखरेख यंत्रणा कार्यान्वित केली आहे.दरम्यान, एमआरपीपेक्षा अधिक दराने खत विक्री झाल्याच्या तक्रारींची दखल घेत तीन खत विक्री केंद्रांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असून संबंधितांना तीन दिवसांच्या आत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. समाधानकारक खुलासा प्राप्त न झाल्यास कायदेशीर तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.शेतकऱ्यांना योग्य दराची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी प्रत्येक कृषी निविष्ठा विक्री केंद्राच्या दर्शनी भागावर खतांच्या कमाल किरकोळ किंमतीचे (एमआरपी) माहितीपत्रक लावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

तसेच शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष खताच्या पिशवीवरील किंमत तपासूनच खरेदी करावी आणि जास्त दराने विक्री अथवा लिंकिंगसारखे प्रकार आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.याचबरोबर ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राप्त तक्रारींची वस्तुस्थिती तपासून ती गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडे तात्काळ कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांच्या हितसंरक्षणासाठी प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविल्या जात असल्याचे गटविकास अधिकारी यांनी स्पष्ट केले.

Post Views: 1,506
Please Share
Previous Post

वादळी वाऱ्याने स्वप्नांचा केला चुराडा

Next Post

सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क

सेलूत साकारतेय प्रिन्स इन्फोटेंटमेंट पार्क

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ