देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 19, 2026
in परभणी
0
खासदार जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन
Please Share

जाधव यांच्या बंडखोरीवरून गंगाखेड, पाथरी, सोनपेठमध्ये शिवसैनिक आक्रमक

परभणी : खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीचे परभणी जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. जाधवांच्या बंडखोरीच्या निषेधार्थ सोनपेठपाठोपाठ गंगाखेड आणि पाथरी शहरात शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने शुक्रवारी, १९ जून २०२६ रोजी तीव्र आंदोलन करण्यात आले.

गंगाखेड येथे जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांच्या नेतृत्वात खासदार संजय जाधव यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासदार संजय जाधव यांनी सर्वप्रथम खासदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जनतेच्या मतांवर निवडून येऊन पक्षाशी बेईमानी करणाऱ्यांना शिवसैनिक कधीही माफ करणार नाहीत, अशा भावना उपस्थित शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख माधव शेंडगे, उपजिल्हाप्रमुख साहेबराव कल्याणकर, बाळासाहेब लोखंडे, शिक्षक सेनेचे जिल्हाप्रमुख बाळासाहेब राखे, माधवराव देसाई, तालुकाप्रमुख जानकीराम पवार, बापूराव पोळ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. आंदोलनामुळे काही काळ परिसरात राजकीय वातावरण तापले होतेे.

पाथरी शहरात निषेध मोर्चा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी पाथरी तहसील कार्यालयासमोर खासदार संजय जाधव यांच्या भूमिकेविरोधात प्रतीकात्मक निषेध आंदोलन केले. शहरातून निषेध मोर्चा व प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तहसील कार्यालयासमोर जाधव यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्याचे दहन केले. “गद्दारी खपवून घेणार नाही” अशा घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांच्यासह कल्याणराव रेंगे, मुंजाभाऊ कोल्हे, हरिभाऊ वाकणकर, आत्माराम वाघ, रंजित गिराम, रावसाहेब निकम, तुकाराम हरकळ, सत्यनारायण घाटुळ, माऊली गलबे आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, जिल्हाप्रमुख रविंद्र धर्मे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “बाळासाहेबांची विचारधारा सोडून सत्तेच्या जवळ जाणाऱ्या निर्णयांचा आम्ही निषेध करत आहोत. जनतेचा विश्वासघात करणाऱ्या लोकप्रतिनिधींना लोकशाही मार्गाने जाब विचारला जाईल.”

सोनपेठमध्ये प्रतिकात्मक अंत्ययात्रा : खासदार संजय जाधव यांच्या बंडखोरीनंतर सोनपेठमध्ये निष्ठावान शिवसैनिकांनी आक्रमक होत जाधवांच्या प्रतिमेला तीव्र जोडे मारून निषेध केला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर गुरुवारी, १८ जून रोजी शिवसैनिक प्रचंड संतापलेले पाहायला मिळाले. संतप्त कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या छायाचित्राला चपलांचा हार घातला आणि तिथूनच त्यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली. ‘गद्दार संजय जाधव’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा मोर्चा शहराच्या मुख्य भागात आणला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाधव यांच्या प्रतिमेचे जाहीर दहन करण्यात आले. आंदोलनात विधानसभा प्रमुख कल्याणराव रेंगे उपजिल्हाप्रमुख कृष्णा पिंगळे, संतोष गवळी, अमोल दहीवाळ, श्रीकृष्ण साठे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,394
Please Share
Previous Post

शिक्षक गव्हाणे यांची बदली रद्द करा

Next Post

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

ज्ञानसाधना डी.फार्मसीचा ९७ टक्के निकाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ