देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 21, 2026
in परभणी
0
सेलू तालुक्यात ५० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य
Please Share

एचएआरसी संस्थेचा स्तुत्य उपक्रम,एकल पालक आणि अनाथ मुलांच्या पाठीवर संस्थेचा मायेचा हात; दानशूरांच्या मदतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप

सेलू : परभणी येथील होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (एचएआरसी) या संस्थेच्या वतीने शैक्षणिक पालकत्व उपक्रम २०२६ अंतर्गत सेलू तालुक्यातील ५० एकल पालक व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वितरण करण्यात आले.

सेलू येथील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात शनिवार, तारीख २० रोजी हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. सचिन मंत्री हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण गाडेकर व रवी मंत्री यांची उपस्थिती होती. याप्रसंगी एचएआरसीचे अध्यक्ष डॉ. पवन एस. चांडक, बाळू बुधवंत, प्रमोद देशमुख, रामराव गायकवाड, अनुराज रासकटला, संतोष माहुरकर आणि वाचन चळवळ समन्वयक माधव गव्हाणे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, पालक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पवन चांडक यांनी केले, तर सूत्रसंचालन पांडुरंग पाटणकर यांनी केले.या उपक्रमाचा लाभ वालूर, माले टाकळी, कुंडी, वाहेगाव, केमापूर, म्हाळसापूर, ब्रह्मवाकडी, काजळी रोहिणा, चिकलठाणा, देऊळगाव, साळेगाव, हादगाव व राजवाडी येथील ५० विद्यार्थ्यांना झाला. हे सर्व विद्यार्थी एकल पालक असून, त्यांच्या गरजा लक्षात घेऊन हे साहित्य देण्यात आले. यासोबतच नववी व दहावीच्या परतूर, सातोना व नूतन विद्यालयातील एकल पालक विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकेही प्रदान करण्यात आली.या उपक्रमासाठी समाजातील दात्यांनी उत्स्फूर्त आर्थिक सहकार्य केले. डॉ. सतीश पंचदार, सीए रोहित मंत्री, रवींद्र मंत्री, सीए सागर तोतला, पवन मुंदडा, पराग पारीख, विनायक कुंटे, नरेश मोदानी, अल्पना डागा आणि स्वाती कुशवाहा यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य पोहोचविणे शक्य झाले.यावेळी लक्ष्मण गाडेकर यांनी संस्थेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे महत्त्व व गरज सांगून भविष्यात या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेऊन समाजात दात्याच्या भूमिकेत उभे राहण्याचे आवाहन केले. आभार प्रदर्शन शरद ठाकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एचएआरसीचे पदाधिकारी, वाचन चळवळीचे कार्यकर्ते, स्वयंसेवक तसेच नानासाहेब पवार व दगडुबा माघाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

किटमधील साहित्य : वितरित करण्यात आलेल्या शैक्षणिक किटमध्ये शाळेची बॅग, वह्या, पेन, पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, रंगपेटी, ड्रॉईंग बुक तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचा समावेश होता. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, अवांतर वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि ज्ञानाचा विस्तार व्हावा या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्यास बालभारती प्रकाशित ‘किशोर’ मासिक भेट देण्यात आले.

Post Views: 1,401
Please Share
Previous Post

यशवाडी दुर्घटना; पाच भाविकांचा मृत्यू

Next Post

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

यशवाडी दुर्घटनास्थळी पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

सेलू तालुक्यात मतदार गणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी यांची माहिती, मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत १,४५,५९२ गणना फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण सेलू : भारत...

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

पिस्टलसह पाच काडतुसे हस्तगत

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

वाशिममध्ये स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई; सिनेस्टाईल पाठलाग करून तिघांना घेतले ताब्यात देशनिष्ठ प्रतिनिधी, वाशिम (फुलचंद भगत) : जिल्ह्यात कायदा...

ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून 'मातोश्री'कडे रवाना !

निष्ठेची आगळीवेगळी सफर : ठाकरे यांच्या भेटीसाठी परभणीचा शिवसैनिक सायकलवरून ‘मातोश्री’कडे रवाना !

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

पक्षप्रमुखांवरील अफाट श्रद्धेपायी परभणी ते मुंबई असा खडतर प्रवास; आमदार डॉ. राहुल पाटील यांच्याकडून शुभेच्छा परभणी : राजकीय उलथापालथीच्या काळातही...

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

नूतन विद्यालयाचे विद्यार्थी रविवारी आकाशवाणीवर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 7, 2026
0

बालमंडळ कार्यक्रमात नाटिका, गीतांचे सादरीकरण सेलू : येथील नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांचा आकाशवाणी परभणी केंद्राच्या रविवारी, ‌‌९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ