परभणी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२४) जाहीर केला आहे. या परीक्षेत परभणी येथील ममता कॉलनीमथील रहिवासी ओम संजना महेश टिकोळे याने घवघवीत यश संपादन केले आहे.
भारतातील अवघड मानल्या जाणाऱ्या चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) परिक्षेत उत्तीर्ण होऊन ओम टिकोळे याने यशाला गवसणी घातली आहे. या निकालात ग्रुप-१ मध्ये
१५३ गुण तर ग्रुप-२ मध्ये १५७ गुण घेऊन तो या परीक्षेत यशस्वी झाला आहे. अभ्यासात सातत्य ठेवत कठोर मेहनतीच्या बळावर तीन वर्षे प्रयत्न करून त्याने हे यश मिळवले आहे. त्याच्या या यशाबद्दल संजना टिकोळे, महेश मधुकर टिकोळे, वेणूबाई टिकोळे, मंजुषा रमेशराव घटे, अनुराधा शिवाजी मोहाळे, राखी टिकोळे, आनंद मधुकर टिकोळे, कृष्णा टिकोळे, अमेय टिकोळे, आर्यन टिकोळे, आयुष टिकोळे तसेच मित्र परिवार व नातेवाईक यांच्याकडून ओमचे अभिनंदन होत आहे.




