परभणी : येथील साहित्यिक बा.बा. कोटंबे यांच्या अलिकडेच प्रकाशित झालेल्या ‘बयनामा’ या कथासंग्रहासमराठी भाषा संवर्धन बहुउद्देशिय संस्था ढाणकी ता. उमरखेड जि. यवतमाळ च्या वतीने राज्यस्तरीय वाड्मय पुरस्कार जाहीर झाला आहे.
मराठी भाषा संवर्धन संस्था, ढाणकी, जि. यवतमाळ यांच्या वतीने स्मृतिशेष लक्ष्मीबाई तुकाराम सूर स्मृती कथासंग्रह पुरस्कार अंतर्गत प्रदान करण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार २०२४ साठी कोटंबे यांच्या ‘बयनामा’ (कथासंग्रह) या साहित्यकृतीची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव म्हणून हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असून पुरस्कार वितरण समारंभ दि. १२ जुलै २०२६ रोजी शासकीय विश्रामगृह, बसस्थानकच्या बाजूला, वणी, जि. यवतमाळ येथे सकाळी ११.३० वाजता आयोजित केलेला आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल असे आहे. पुरस्कार निवडीचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पेंढरवाड यांनी पाठवले आहे.
कोटंबे यांचे ‘ मुसाफिर’, ‘ पैंजण’, ‘ काळरात्र’, ‘ अंधार’, ‘ झावळ’, ‘ तिटा’, ‘ कदाचित’, ‘ ऊन सावलीच्या शोधात’ या कादंबऱ्या, ‘ सांज पावसाळी’, ‘ बयनामा’ हे कथासंग्रह, ‘ गोष्टी गावाकडच्या’ हा ललीत लेख संग्रह, ‘गोप्या’ हा बाल कथासंग्रह इत्यादी साहित्य संपदा प्रकाशित झालेली आहे. उत्कृष्ट कथालेखनासाठी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
सीए परीक्षेत ओम टिळे याचे यश
परभणी : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (ICAI) चार्टर्ड अकाउंटन्ट (सीए) इंटरमीडिएट परीक्षेचा निकाल बुधवारी (दि.२४) जाहीर केला आहे....





