लोककल्याणकारी योजनांचा लाभ एकाच छताखाली

जिंतूर : महाराष्ट्र शासनाच्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी, २४ जुलै २०२६ रोजी जिंतूर येथे लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरास’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे उद्घाटन पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे, जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, नगराध्यक्ष प्रताप देशमुख, पंचायत समिती सभापती अयोध्या खिस्ते, उपविभागीय अधिकारी शैलेश लाहोटी, तहसीलदार शिवाजी मगर, शीतल कच्छवे, सहायक निबंधक बी.एस.नांदापूरकर आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती. शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देणे, महसूल व इतर शासकीय विभागांच्या सेवा सुलभ करणे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांचे तत्काळ निराकरण करणे, हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमास सर्व विभागप्रमुख, विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, अंगणवाडी सेविका, आशाताई आणि मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.





