देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
in परभणी
0
नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा
Please Share

परभणी, दि.२९ : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत परभणीच्या वतीने नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत श्री शिवाजी महाविद्यालय, येथे जिल्हास्तरीय विविध स्पर्धा व जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला.

उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. रोहिदास नितोंडे होते. अमली पदार्थ विरोधी पथक, नांदेड विभागाचे श्री. कोरंटलू प्रमुख उपस्थित म्हणून लाभले. जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट करत युवकांनी व्यसनमुक्त राहून विकसित भारताच्या निर्मितीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवरांना नशामुक्तीची शपथ देण्यात आली. व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी स्वतः व्यसनापासून दूर राहणे तसेच इतरांनाही त्याबाबत जागरूक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.यानंतर श्री. कोरंटलू यांनी व्यसनाधीनतेमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाजावर होणाऱ्या गंभीर दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन केले. युवकांनी कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहून निरोगी, जबाबदार आणि जागरूक नागरिक म्हणून जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले.अभियानांतर्गत चित्रकला, वक्तृत्व, घोषवाक्य लेखन, स्लॅम पोएट्री आणि रील स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश आपल्या सादरीकरणातून दिला. वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांनी “नशा करायचीच असेल तर ती स्वप्नांची, मेहनतीची, यशाची आणि आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याची असावी,” असा प्रेरणादायी संदेश दिला.स्पर्धांचे पर्यवेक्षक म्हणून प्रा. डॉ. एस. एल. राठोड, प्रा. सविता कोकाटे, प्रा. अंकुश खटिंग, प्रा. स्वाती देशमुख, प्रा. अतुल समिंद्रे, प्रा. अनिल बडगुजर आणि प्रा. राधिका सोळंके यांनी जबाबदारी पार पाडली.स्पर्धांमध्ये चित्रकला स्पर्धेत सिध्दी देशमुख, वक्तृत्व स्पर्धेत अनुसया कुलथे, रील स्पर्धेत शर्वरी सांगळे, घोषवाक्य लेखन स्पर्धेत गीता गिरकर आणि स्लॅम पोएट्री स्पर्धेत निकिता आसोलकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. विजेत्यांना प्रमाणपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. तुकाराम फिसफिसे यांनी केले. बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी होते.कार्यक्रमासाठी सहाय्यक विभाग अधिकारी गजानन गाडेकर तसेच मेरा युवा भारतचे स्वयंसेवक दीपक खुळे आणि स्नेहा वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अनिल बडगुजर यांनी केले.

“नशेला नकार – विकसित भारताला होकार” हा संदेश युवकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापकवृंद, कर्मचारी, मेरा युवा भारतचे जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, सहाय्यक विभाग अधिकारी गजानन गाडेकर, स्वयंसेवक दीपक खुळे, स्नेहा वाघमारे तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले.

Post Views: 1,490
Please Share
Previous Post

एसआयआर : सेलू तालुक्यातील १,३३,४४९ मतदारांची माहिती डिजिटाईज्ड

Next Post

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ