देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
in परभणी
0
जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविण्यासाठी पी.डी.एन. प्रकल्पाचे काम प्राधान्याने करावे
Please Share

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचे निर्देश, येलदरी धरणातून पाणीपुरवठ्याबाबत मुंबईत आढावा बैठक

परभणी, दि. २९ : येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत शासन सकारात्मक आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्याअनुषंगाने सर्व यंत्रणांनी समन्वयाने आणि गतीने काम करून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी आज दिले.

राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथील निर्मल भवन येथे एमएसआरडीसी कार्यालयात याबाबत महत्त्वाची बैठक पार पडली. येलदरी धरणाच्या उद्भवातून जिंतूर तालुक्याकरिता बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दूरदृश्यप्रणाली द्वारे या बैठकीस परभणीचे जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण, नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत संबंधित विभाग प्रमुखांनी प्रकल्पाच्या सद्यस्थितीचे व प्रगतीचे सादरीकरण केले. जिंतूर तालुक्यातील अवर्षणप्रवण तसेच सिंचनाच्या अल्प सोयी असलेल्या भागातील शेतकऱ्यांची बंद पाईपलाईनद्वारे (पी.डी.एन.) सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. येलदरी धरणातून उपसा करून जिंतूर तालुक्यातील केहाळ, सावंगी म्हाळसा, हिवरखेडा, चारठाणा, भोसी यांसारख्या अनेक गावांना सिंचनाचा लाभ मिळणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने व्यापक जनहिताचा हा प्रश्न सोडवीण्यासाठी आवश्यक उपाययोजना प्राधान्याने करण्याचे निर्देश राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिले. राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यावेळी म्हणाल्या, जिंतूर तालुक्यातील सिंचन प्रश्न सोडविणे ही शासनाची प्राथमिकता आहे. बदलती पीक पद्धती, या पिकांना सिंचनासाठी आवश्यक पाणी पुरवठा आणि संबंधित सर्व मुद्द्यांचा अभ्यास प्राधान्याने करावा. व्यापक शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून पुढील कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

Post Views: 1,419
Please Share
Previous Post

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धा

Next Post

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

वनाकृविचा राष्ट्रीय स्तरावर गौरव : नॅशनल ग्रीन युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशात १८ वे स्थान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ