देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
in परभणी
0
सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा
Please Share

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव

सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे शिक्षक दिनाचे औचित्य साधून ‘सीरत-ए-मुस्तफा’, माजी विद्यार्थ्यांचा सत्कार आणि ‘बेस्ट टीचर’ पुरस्कार प्रदान सोहळा शनिवार, १२ सप्टेंबर रोजी सेलू शहरातील माशा अल्लाह फंक्शन हॉल येथे उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात इयत्ता सातवीचा विद्यार्थी अनस खुरशीद शेख याच्या पवित्र कुराण पठणाने झाली. यानंतर शाह आलम याने अनुवाद सादर केला. इयत्ता सहावीची विद्यार्थिनी आयेशा कमर चाऊस हिने हम्द (ईश्वर प्रार्थना) तर इयत्ता सातवीची विद्यार्थिनी शाफिया अल्ताफ हिने नात सादर केली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मदिना मस्जिदचे खतीब व इमाम मौलाना मोहम्मद रईस कासमी हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून परभणी येथील सय्यद गुलाम मोहम्मद हुसेन उपस्थित होते.

याप्रसंगी इसहाक मामू, मोहम्मद जलील, राहत बँक सेलूचे व्यवस्थापक शेख कलीम बेलदार, बेलदार समाज सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष शैलेजा उर्दू शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद इरफान, सय्यद जिलानी, मजहर खान, सय्यद मुनीर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक करताना मुख्याध्यापक मोहम्मद अब्दुल अलीम सोफी यांनी शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करत, “विद्यार्थ्यांना केवळ शालेय शिक्षण देणे म्हणजे शिक्षक नव्हे, तर त्यांच्यात नैतिक मूल्ये, आई-वडिलांचा व शिक्षकांचा आदर आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे हे शिक्षकांचे खरे कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन केले.

यावेळी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी उर्दू, मराठी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधून सीरत-ए-मुस्तफा यांच्या जीवनावर प्रभावी विचार मांडले.शाळेची माजी विद्यार्थिनी सय्यदा आयेशा सय्यद जिलानी हिची एमबीबीएस वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी निवड झाल्याबद्दल तिचा व तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच मरियम जहाँ मजहर खान (आलिमा कोर्स पूर्ण) आणि राहन फातिमा मजहर खान (डीएमएलटी कोर्स पूर्ण) यांच्यासह बीयूएमएस, बीएचएमएस, अभियांत्रिकी आणि शिक्षण क्षेत्रात यश संपादन केलेल्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.शैक्षणिक वर्षातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेतील गुणवंत शिक्षकांना शाल, पुष्पहार, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देऊन ‘बेस्ट टीचर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हाफेज मोहम्मद जुनेद नदवी यांनी आभार मानले. या सोहळ्यास शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 91
Please Share
Previous Post

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

Next Post

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ