देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in परभणी
0
महसूल दिन : गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचवा : जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण
Please Share

उत्कृष्ट अधिकारी, कर्मचारी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

परभणी : परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात १ ऑगस्ट रोजी महसूल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी महसूल विभागातील उत्कृष्ट अधिकारी व कर्मचारी, निवृत्त कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि जनगणना, निवडणूक व्यवस्थापन व विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कामात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. वेळेत व गुणवत्तापूर्ण सेवेतून प्रशासनाची प्रतिमा उंचावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी या वेळी केले.

जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, महापालिका आयुक्त नितीन नार्वेकर आणि प्रभारी अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांनी प्रास्ताविकात वर्षभरातील कामगिरीचा आढावा घेतला.कार्यक्रमात १ एप्रिल २०२५ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या १७ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच इयत्ता १० वी, १२ वी, शिष्यवृत्ती व तांत्रिक शिक्षण परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना गौरविण्यात आले. जिल्हा व विभाग स्तरावर पोलीस पाटलांपासून उपजिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या विविध संवर्गातील उत्कृष्ट कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.जनगणना २०२७ च्या प्रथम टप्प्यात परभणी जिल्ह्याने राज्यात ९ वा आणि छत्रपती संभाजीनगर विभागात २ रा क्रमांक मिळवल्याबद्दल अनुराधा ढालकरी, जिवराज डापकर, माधवराव बोथीकर व अलताफ मिया यांचा गौरव करण्यात आला. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पारदर्शक नियोजनाबद्दल उपजिल्हाधिकारी अनिता भालेराव यांचा सत्कार झाला. तर विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमात जिल्ह्याने राज्यात ३ रा क्रमांक मिळवल्याबद्दल उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले, जिवराज डापकर, शैलेश लाहोटी व संगीता चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे नियोजन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत वाकोडकर, सहाय्यक महसूल अधिकारी विठ्ठल मोरे, गजानन अन्नपुरे, विशाल गाजरे, तसेच जगदीश दुधारे, प्रदिप मुनेश्वर, दिनेश काळे आणि अर्जुन कांदे यांनी केले.

Post Views: 1,550
Please Share
Previous Post

सेलूतील श्री दत्तमंदिरात नामजप सोहळा

Next Post

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

महावितरणचे कर्मचारी वीज कर्मचारी अधिकारी सेनेत प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ