देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in परभणी
0
रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंतांचा सत्कार
Please Share

प्रेसिडेंशियल टेस्ट, मंथन परीक्षा व डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

सेलू : एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, सेलू येथे प्रेसिडेंशियल टेस्ट, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा तसेच डॉ. होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेत यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत सत्कार सोहळा उत्साहात पार पडला.

विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धात्मक परीक्षांमध्ये मिळविलेल्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या यशात त्यांची मेहनत, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यांचा महत्त्वाचा वाटा असल्याचे या वेळी मान्यवरांनी नमूद केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठान, सेलूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते. या वेळी डॉ. प्रवीण सानप, महेशकुमार चौधरी, डॉ. जोगदंड, डॉ. भाले, अवचार, इक्कर, कैलास मरेवार, त्र्यंबक हजारें, चव्हाण, चव्हाळ तसेच शाळेचे प्राचार्य अनिल आणि मीरा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या वेळी विविध परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसमवेत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यामध्ये स्पर्धात्मक परीक्षांची जाणीव निर्माण करणे हा शाळेच्या शैक्षणिक धोरणाचा महत्त्वाचा भाग असल्याचे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले.डॉ. प्रवीण सानप यांनी मनोगत व्यक्त करताना एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलच्या विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचे विशेष कौतुक केले.

विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण न देता विविध स्पर्धा परीक्षा, सामान्य ज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणाऱ्या उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याच्या शाळेच्या प्रयत्नांचे त्यांनी अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला योग्य दिशा देण्यासाठी शाळेकडून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असून, या माध्यमातून विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक आव्हानांसाठी सक्षम केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

महेशकुमार चौधरी यांनीही आपल्या मनोगतात शाळेच्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक व अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शाळेकडून दिल्या जाणाऱ्या संधी आणि शिक्षकांचे मार्गदर्शन उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची सातत्याने गरज असून, शाळेने राबविलेल्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक वृत्ती निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. गुणवंत विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे त्यांनी विशेष अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय रोडगे म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्या क्षमतेला योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण संधी मिळाल्यास विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. केवळ पाठ्यपुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन, स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास निर्माण करणे ही शाळेची जबाबदारी आहे. विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत. गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव हा इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरावा, यासाठी शाळा भविष्यातही अशा विविध शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देत राहील.

“कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. शेवटी मीरा यांनी आभार प्रदर्शन केले.

Post Views: 1,767
Please Share
Previous Post

सेलूत अनेकांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश

Next Post

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

परभणीच्या प्रसिद्ध चित्रकार काका यांची चित्रे मुंबईच्या नेहरू सेंटरमध्ये

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ