देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
in वाशिम
0
घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार
Please Share

मंगरुळपीर शहरातील घटना

वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा तब्बल ५ लाख ८७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने घेऊन गेल्याची तक्रार मंगरुळपीर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या घटनेत पतीला काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा तसेच कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या नोंदीनुसार, संबंधित कुटुंबीय रात्री घरात झोपले असताना संशयित व्यक्तींनी घराच्या दरवाजाची कडी उघडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील व्यक्तींना धाक दाखवत मारहाण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. रात्रीच्या सुमारास घरात गोंधळाचा आवाज झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी जागे होऊन पाहिले असता संशयित व्यक्ती घरात असल्याचे निदर्शनास आले.तक्रारीनुसार, संशयितांनी पतीला काठीने मारहाण केली. तसेच कुटुंबातील महिलांसह इतर सदस्यांना चाकू/काठीचा धाक दाखवत धमकावले. यावेळी घरातील रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने जबरदस्तीने घेण्यात आल्याचा आरोप आहे.पोलिस नोंदीतील तक्रारीनुसार, घरातून रोख ५ लाख रुपये, तसेच सोन्याचा हार, लेडीज अंगठी, जेन्ट्स अंगठी, लहान मुलाची अंगठी आदी मिळून सुमारे २७ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चांदीचे पैंजण असा ऐवज नेण्यात आल्याचे नमूद आहे. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ५ लाख ८७ हजार ७०० रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.घटनेनंतर संशयितांनी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत घटनास्थळावरून पळ काढल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोलीसांनी अज्ञात सात आरोपीविरुध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.*मंगरुळपीर पोलिसांकडून तपास सुरू*घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी तात्काळ पोहचुन पंचनामा केला.श्वानपथकालाही प्राचारण करण्यात आले होते.घटनास्थळी पोलिस अधिक्षक,ऊपविभागिय पोलिस अधिकारी,ठाणेदार मंगरुळपीर ,एलसिबी पथक यांनी भेट देवुन घटनेविषयी सविस्तर माहीती घेतली.या प्रकरणी मंगरुळपीर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी घटनेची नोंद घेत तपास सुरू केला आहे.पुढील तपास पोलिस करत आहेत.

Post Views: 1,458
Please Share
Previous Post

परभणीतील शिबिरात १४०० रुग्णांची मोफत तपासणी

Next Post

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

१४ सप्टेंबर पासून गणेशोत्सव, बँड पथक, सजावटीसाठी मंडळांची तयारी सुरू, १९ दिवस उशिराने आगमन, १२ दिवस मुक्काम वाशिम : हिंदू...

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

पशुधनासाठी आता विम्याचे कवच

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

राज्यात 'पशुधन विमा योजना' लागू, जनावरांच्या मृत्यूवर मिळणार 80 हजारांपर्यंत मदत देशनिष्ठ , प्रतिनिधी, वाशिम : राज्यातील पशुपालक शेतकऱ्यांसाठी एक...

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

बालविवाह रोखण्यासाठी लोकचळवळ आवश्यक

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

कायद्याच्या अंमलबजावणीसोबत जनजागृती, पालकांचा सहभाग आणि ग्रामस्तरावरील सतर्कता महत्त्वाची फुलचंद भगत, वाशिम बालविवाह ही केवळ सामाजिक प्रथा नसून बालकांच्या शिक्षण,...

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

घरात घुसून मारहाण; ५ लाख ८७ हजारांचा ऐवज लुटल्याची तक्रार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 10, 2026
0

मंगरुळपीर शहरातील घटना वाशिम : मंगरुळपीर शहरात रात्रीच्या सुमारास एका घरात चोरट्यांनी घुसून कुटुंबीयांना मारहाण करत रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ