देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

नरसापूर येथील ‘त्या’ कुटुंबाला अखेर न्याय

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in परभणी
0
नरसापूर येथील ‘त्या’ कुटुंबाला अखेर न्याय
Please Share

तहसीलदारांचा सातबारा दुरुस्तीचा महत्त्वपूर्ण आदेश; संजय आडे यांच्या पाठपुराव्याला यश

जिंतूर : सेलू तालुक्यातील मौजे नरसापूर येथील गट क्रमांक २६ संदर्भातील प्रलंबित महसूल प्रकरणात अखेर संबंधित कुटुंबाला न्याय मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय रामराव आडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर सेलूच्या तहसीलदार यांनी १३ जुलै २०२६ रोजी आदेश पारित करून सातबारा व फेरफार नोंदीमध्ये आवश्यक दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले आहेत.

या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, सेलू यांनी १६ डिसेंबर २०२२ रोजी आदेश पारित केला होता. त्या आदेशानुसार नरसापूर येथील गट क्रमांक २६ मधील १ हेक्टर ०० आर क्षेत्राबाबत झालेला फेरफार क्रमांक १०८८ (दिनांक १६ जानेवारी २०२०) रद्द करून मयत शेषराव शंकर गडदे यांच्या नावाची नोंद पूर्ववत करणे अपेक्षित होते. मात्र, अंमलबजावणीला विलंब होत असल्याने संजय रामराव आडे यांनी महसूल प्रशासनाकडे आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.प्रकरणात सुनावणी घेऊन मूळ अभिलेख, ७/१२ उतारे व फेरफार नोंदींची तपासणी करण्यात आली. त्यानंतर तहसीलदारांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ मधील कलम १५५ अन्वये संगणकीकृत ७/१२ मध्ये दुरुस्तीचे निर्देश दिले. आदेशानुसार विविध खातेदारांच्या नावावरील क्षेत्रात घट करून मयत शेषराव शंकर गडदे यांच्या नावावर नोंद करण्याची कार्यवाही केली जाणार असून, ऑनलाइन फेरफार घेऊन दुरुस्ती तात्काळ करण्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.

“अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार महसूल नोंदी दुरुस्त होणे गरजेचे होते. प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून मयत शेषराव गडदे यांच्या कुटुंबाला अखेर त्यांचा हक्क आणि न्याय मिळाला आहे.”— संजय रामराव आडे, सामाजिक कार्यकर्ते

Post Views: 1,407
Please Share
Previous Post

अधिकमासामुळे यंदा गणपती बाप्पाचे उशिरा आगमन

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले

शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ