देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in परभणी
0
शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले
Please Share

सेलूतील ‘नूतन’ च्या १२ शिष्यवृत्तीधारकांचा सत्कार

सेलू : सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत. तर इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेचे चार विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत. या गुणवंतांचा मंगळवारी, ११ ऑगस्ट २०२६ रोजी नूतन विद्यालयात सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून गटशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे, तर संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक किरण देशपांडे, दत्तराव घोगरे, शंकर बोधनापोड, गणेश माळवे आदींसह मान्यवरांची उपस्थिती होती.

या परीक्षेत तन्मय जयकिशन भुतडा याने २८० गुण मिळवून जिल्ह्यात पहिला तर राज्यात १० वा क्रमांक पटकावला आहे. सान्वी गजानन शितळे हिने २७६ गुण मिळवून जिल्ह्यात दुसरी आणि राज्यात १४ वी येण्याचा बहुमान मिळवला.त्याचप्रमाणे, विठ्ठल अजयकुमार बोरसे याने २५८ गुण, जिल्ह्यात ११ वा), रायबा तानाजी भोसले २५६ गुण, जिल्ह्यात १३ वा, आराध्या नितीन रोडगे २५४ गुण (१४ वी) , विनायक महेश गोंडगे २३२ गुण ( ३६ वा), राम अशोक वायाळ २१६ गुण ( ६७ वा) आणि सुयश पुरुषोत्तम गिरी २०८ गुण मिळवून जिल्ह्यात ७९ वा आहे.

समृद्धी भुतडा राज्यात दुसरी

सौ.सावित्रीबाई बद्रिनारायणजी बिहाणी नूतन प्राथमिक शाळेच्या समृद्धी जयकिशन भुतडा हीने ९६.६६ टक्के‌ गुण मिळवून राज्यात दुसरा तर, जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे, याच शाळेच्या अजय अमोलराव लाटे (७८.६६ टक्के, जिल्ह्यात १६ वा), पनिका दीपक भुक्तर ( ६६ टक्के, जिल्ह्यात ७८वी, रुद्र नारायण जगताप (६५.३३ टक्के, जिल्ह्यात ८७ वा आहे आणि प्रांजल महादेव दरेकर ( उत्तेजनार्थ) यांनी जिल्हा यादीत स्थान मिळविले आहे.

कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांसह विभाग प्रमुख सुनील तोडकर, अरविंद अंबेकर, शैलजा कऊटकर, बाळू बुधवंत, संभाजी रोडगे, मनिषा इक्कर आणि अर्जून पंडित या मार्गदर्शकांचा सत्कार करण्यात आला. या यशाबद्दल मंगळवारी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष डी.के.देशपांडे, सचिव डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष सितारामजी मंत्री, नंदकिशोरजी बाहेती, मकरंद दिग्रसकर, मुख्याध्यापक एकनाथ जाधव, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. सूत्रसंचालन सुनील तोडकर यांनी केले. बाळू बुधवंत यांनी आभार मानले.

Post Views: 1,625
Please Share
Previous Post

नरसापूर येथील ‘त्या’ कुटुंबाला अखेर न्याय

Next Post

ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान

ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ