देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in परभणी
0
ब्रह्माकुमारी विद्यालयाचे व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान
Please Share

सेलूतील नूतन विद्यालयात प्रबोधनपर कार्यक्रम

सेलू : भारत सरकारच्या ‘नशामुक्त भारत अभियान’ आणि ‘मिशन स्पंदन’ अंतर्गत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने सोमवार, दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी नूतन विद्यालय, सेलू येथे ‘१० कोटी व्यसनमुक्त भारत संकल्प महाभियान’ उत्साहात संपन्न झाले.

दादी प्रकाशमणिजी यांच्या पावन स्मृतीनिमित्त ब्रह्माकुमारीजच्या मेडिकल विंगच्या पुढाकाराने देशभरातील १० हजारांहून अधिक केंद्रांवर या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. याच अभियानाचा एक भाग म्हणून नूतन विद्यालयातील विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

यावेळी सेलू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या ब्रह्माकुमारी राधा दीदी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, दारू तसेच अन्य व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले. योग, ध्यान, सकारात्मक विचार आणि निरोगी जीवनशैलीचा अंगीकार करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना व्यसनमुक्त भारताची संकल्प शपथ देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक के. के. देशपांडे होते. यावेळी रंगनाथ तांबे भाई, उपमुख्याध्यापक डी. बी. घोगरे, एस. डी. बोधनापोड आणि जी. एस. माळवे यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यसनमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक असून, नशामुक्त व निरोगी समाज हीच देशाच्या प्रगतीची भक्कम पायाभरणी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला. सूत्रसंचालन डॉ. काशिनाथ पल्लेवाड यांनी तर आभार प्रदर्शन बाळू बुधवंत यांनी मानले.

Post Views: 1,498
Please Share
Previous Post

शिष्यवृत्ती परीक्षा : तन्मय,सान्वी, समृद्धी राज्य यादीत झळकले

Next Post

श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी

श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ