देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 11, 2026
in परभणी
0
पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांचा अभिनव उपक्रम : नागरीकांचा परभणी पोलिसांशी थेट संपर्क अधिक सुलभ
Please Share

प्रत्येक पोलीस ठाणे व प्रमुख शाखांना कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक जाहीर

परभणी, दि.11 : नागरिकांना पोलीस विभागाशी सहजपणे संपर्क साधता यावा, तक्रारी व अडचणींसाठी संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क करता यावा आणि पोलीस विभागातील विविध कार्यालये व शाखांचा नागरिकांशी सातत्यपूर्ण संपर्क राहावा, या उद्देशाने परभणी जिल्हा पोलीस दलाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे तसेच प्रमुख शाखांना स्वतंत्र कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक व सिमकार्ड उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या उपक्रमांतर्गत पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सर्व विभागीय पोलीस अधिकारी, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी तसेच जिल्हा पोलीस दलातील विविध महत्त्वाच्या शाखा व पथकांना स्वतंत्र शासकीय मोबाईल व सिमकार्ड देण्यात आले आहेत. यामध्ये सायबर सेल, भरोसा सेल, जिल्हा विशेष शाखा, वाहतूक शाखा, स्थानिक गुन्हे शाखा, अर्ज शाखा, 112 सेवा तसेच विविध उपविभागीय पोलीस कार्यालये आणि पोलीस ठाण्यांचा समावेश आहे.संबंधित कार्यालयांना देण्यात आलेले मोबाईल क्रमांक कायमस्वरूपी राहणार असून त्यामध्ये बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे अधिकारी किंवा कर्मचारी बदलले तरी संबंधित कार्यालयाचा संपर्क क्रमांक कायम राहणार आहे.

यामुळे नागरिकांना संबंधित अधिकार्‍याचा वैयक्तिक क्रमांक शोधण्याची आवश्यकता राहणार नसून, थेट संबंधित पोलीस ठाणे किंवा शाखेच्या अधिकृत शासकीय क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.या शासकीय मोबाईल क्रमांकांचा वापर कर्तव्यावर असलेल्या अधिकारी किंवा कर्मचार्‍यांकडे राहणार आहे. नागरिकांनी संपर्क साधल्यास संबंधित पोलीस कार्यालयाशी आवश्यकतेनुसार संपर्क साधता येणार असून, कार्यालयीन व शासकीय कामकाज, नागरिकांच्या तक्रारी, आवश्यक माहितीची देवाणघेवाण तसेच इतर अधिकृत कामांसाठी या क्रमांकांचा वापर करण्यात येणार आहे. विशेषतः पोलीस ठाणे आणि विविध शाखांना देण्यात आलेले क्रमांक त्या कार्यालयाची कायमस्वरूपी संपर्क ओळख म्हणून कार्य करतील. संबंधित अधिकारी अथवा कर्मचारी बदलल्यासही क्रमांक बदलणार नसल्याने नागरिकांचा संपर्क कायम राहणार आहे. त्यामुळे ‘कोणत्या अधिकार्‍याचा क्रमांक घ्यायचा?’ या संभ्रमातून नागरिकांची सुटका होऊन संबंधित कार्यालयाशी थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे.

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलीस आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक गतिमान, पारदर्शक आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. नागरिकांच्या तक्रारी व समस्या संबंधित यंत्रणेपर्यंत जलदगतीने पोहोचविण्यास तसेच पोलीस प्रशासनाशी संपर्क अधिक प्रभावी करण्यास या व्यवस्थेची मदत होणार आहे.‘पोलीस विभाग नागरिकांच्या अधिक जवळ आणणे आणि नागरिकांना पोलीस सेवांशी सहजपणे जोडणे’ या उद्देशाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या गरजेनुसार संबंधित पोलीस ठाणे अथवा शाखेच्या अधिकृत शासकीय मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले आहे.

परभणी जिल्हा पोलीस दलाकडून नागरिकाभिमुख पोलीसिंगच्या दिशेने उचलण्यात आलेले हे आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात असून, या उपक्रमामुळे नागरिक आणि पोलीस प्रशासन यांच्यातील संवाद अधिक सुलभ व प्रभावी होण्यास मदत होणार आहे.

कायमस्वरूपी संपर्क क्रमांक जाहीर

परभणी जिल्हा पोलीस दलाने नागरिकांच्या सोयीसाठी विविध पोलीस कार्यालये, शाखा, उपविभाग आणि पोलीस ठाण्यांचे कायमस्वरूपी शासकीय मोबाईल क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये पोलीस अधीक्षक, परभणी – 8956834900, अपर पोलीस अधीक्षक, परभणी – 8956834901, उप अधीक्षक, परभणी (मु.) – 8956834902, स्थानिक गुन्हे शाखा – 8956834903, जिल्हा विशेष शाखा – 8956834904, जिल्हा वाहतूक शाखा – 8956834905, भरोसा सेल, परभणी – 8956834906, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष – 8956834907, अर्ज शाखा – 8956834908, सायबर सेल, परभणी – 8956834909, डायल 112 – 8956834910, उपविभाग परभणी शहर – 8956834911, पोलीस ठाणे नानलपेठ – 8956834912, पोलीस ठाणे नवा मोंढा – 8956834913, पोलीस ठाणे कोतवाली – 8956834914, उपविभाग परभणी ग्रामीण – 8956834915, पोलीस ठाणे परभणी ग्रामीण – 8956834916, पोलीस ठाणे दैठणा – 8956834917, पोलीस ठाणे ताडकळस – 8956834918, उपविभाग सेलू – 8956834919, पोलीस ठाणे सेलू – 8956834920, पोलीस ठाणे मानवत – 8956834921, पोलीस ठाणे पाथरी – 8956834922, उपविभाग जिंतूर – 8956834923, पोलीस ठाणे जिंतूर – 8956834924, पोलीस ठाणे बोरी – 8956834925, पोलीस ठाणे बामणी – 8956834926, पोलीस ठाणे चारठाणा – 8956834927, उपविभाग गंगाखेड – 8956834928, पोलीस ठाणे गंगाखेड – 8956834929, पोलीस ठाणे सोनपेठ – 8956834930, पोलीस ठाणे पिंपळदरी – 8956834931, उपविभाग पूर्णा – 8956834932, पोलीस ठाणे पूर्णा – 8956834933, पोलीस ठाणे पालम – 8956834934, पोलीस ठाणे चूडावा – 8956834935, अधीक्षक कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, परभणी – 8956834936. नागरिकांनी तक्रारी, अडचणी किंवा आवश्यक माहितीसाठी संबंधित कार्यालयाच्या क्रमांकावर थेट संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Post Views: 1,042
Please Share
Previous Post

श्रीक्षेत्र हरंगुळ यात्रेनिमित्त आरोग्य विभागाकडून पूर्वतयारी

Next Post

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

राष्ट्रीय महामार्गावरील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे तातडीने हटविण्याची कार्यवाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ