देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी न केल्याने शिक्षक निलंबित

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 14, 2026
in वाशिम
0
दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी न केल्याने शिक्षक निलंबित
Please Share

वाशिम जिल्हा परिषदेची मोठी कारवाई

वाशिम (फुलचंद भगत) : शासकीय नियमांनुसार आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची कायदेशीर पडताळणी न करणे आणि प्रशासकीय आदेशांकडे दुर्लक्ष करणे वाशिम जिल्ह्यातील एका प्राथमिक शिक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान यांनी माधव उत्तमराव जाधव (सहशिक्षक, जि. प. प्राथमिक शाळा नागठाणा, ता. जि. वाशिम) यांना शासकीय सेवेतून तात्काळ निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे जिल्हा परिषद शिक्षण वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, माधव उत्तमराव जाधव हे नागठाणा येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राबाबत प्राप्त तक्रारींच्या पार्श्वभूमीवर, शासनाने सर्व दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचे आदेश जारी केले होते. या धोरणानुसार वाशिम जिल्हा परिषद कार्यालयाकडून संबंधित शिक्षकाला आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची पडताळणी करून घेण्याबाबत वेळोवेळी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.परंतु, वारंवार नोटिसा देऊनही शिक्षक माधव जाधव यांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची पडताळणी केली नाही, तसेच या संदर्भात कोणताही खुलासा किंवा माहिती वरिष्ठ कार्यालयाला सादर केली नाही. ही वर्तणूक प्रशासनाची दिशाभूल करणारी आणि शासकीय आदेशांची अवमानना करणारी असल्याचे समोर आले.या गंभीर बाबीची दखल घेत, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ नुसार माधव उत्तमराव जाधव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय ‘पंचायत समिती, रिसोड’ येथे ठेवण्यात आले असून, पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशावर शिक्षणाधिकारी विठ्ठल भुसारे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय गणवीर यांच्या डिजिटल स्वाक्षऱ्या आहेत.

Post Views: 1,422
Please Share
Previous Post

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न देण्याची मागणी

Next Post

पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

पोटी जिल्हा परिषद शाळेला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ