देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

खेळ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग : डॉ. आशिष डख

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 29, 2026
in परभणी
0
खेळ हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य भाग : डॉ. आशिष डख
Please Share

नूतन विद्यालय सेलू येथे राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात; आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

सेलू, दि.२९ : येथील नूतन विद्यालयात २९ ऑगस्ट रोजी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ‘खेलेगा भारत-जितेगा भारत’ या संकल्पनेतून आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय खेळाडू तसेच क्रीडा प्रशिक्षकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे डॉ. एस. एम. लोया होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. आशिष डख, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध नाईक, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिल्हा संघटक दिनकर वाघ, तालुकाध्यक्ष गणेश काटकर, प्रशासकीय अधिकारी डॉ. शरद कुलकर्णी, प्रभारी मुख्याध्यापक डी. बी. घोगरे, पर्यवेक्षक एस. जी. बोधनापोड व जी. एस. माळवे यांची उपस्थिती होती.सुरुवातीला ‘खेळ खेळूया, देशाची शान वाढवूया’ या स्वागतगीताने व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेच्या पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक पर्यवेक्षक गणेश माळवे यांनी केले. याप्रसंगी ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय लॅक्रास स्पर्धेतील सहभागाबद्दल अजय नारायणराव चव्हाण यांचा, तर इंग्लंडमधील टेबल टेनिस वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागाबद्दल कु. आद्या महेश बाहेती हिचा विशेष सत्कार करण्यात आला. यासोबतच विविध खेळांमधील गुणवत्ताप्राप्त खेळाडू आणि प्रशिक्षकांनाही सन्मानित करण्यात आले.

खेळ हा केवळ मनोरंजनाचा विषय नसून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. खेळामुळे शिस्त, संघभावना, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि जिद्द निर्माण होते; त्यामुळे विद्यार्थ्यांनी खेळाला दैनंदिन जीवनात योग्य स्थान द्यावे, असे प्रतिपादन डॉ. आशिष डख यांनी केले.माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाच्या माध्यमातून देशाचे नाव उज्ज्वल करण्याचे आवाहन केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. एस. एम. लोया यांनी क्रीडा क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्याचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. काशीनाथ पल्लेवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रशांत नाईक यांनी केले. यशस्वी आयोजनासाठी क्रीडा विभागप्रमुख प्रशांत नाईक, संजय भुमकर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 1,588
Please Share
Previous Post

हरिहर लेकुळे यांची भाजपा ओबीसी मोर्चा हिंगोली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

Next Post

खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता

खेळातूनही करिअरच्या उत्तम संधी : अनुप गुप्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ