देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in वाशिम
0
गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहाने साजरा करा
Please Share

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन; जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा उत्साहात

फुलचंद भगत / वाशिम : वाशिम जिल्ह्यातील सण-उत्सवांची शांतता, सामाजिक सलोखा आणि एकोप्याची परंपरा यंदाही कायम ठेवत सर्वांनी एकत्रितपणे, गुण्यागोविंदाने आणि आनंदाने गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.

येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नागरिकांनी आणि गणेश मंडळांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.गणेशोत्सव तसेच श्री गणेश विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हास्तरीय शांतता समितीची सभा नियोजन भवन सभागृहात झाली. अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी कुंभेजकर बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, भूसंपादन उपजिल्हाधिकारी दीपक बाजड आदी उपस्थित होते.

मिरवणूक मार्गांची पाहणी व आवश्यक उपाययोजना

गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुका शांततेत व सुरळीतपणे पार पडण्यासाठी मुख्य मिरवणूक मार्गांची पाहणी करून आवश्यक त्रुटींची पूर्तता करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी सांगितले. सर्व गणेश मंडळांनी नियमांचे पालन करावे. सर्वसामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारे अनावश्यक त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. गणेश मंडळांना रीतसर परवानगी देताना अनावश्यक विलंब होणार नाही, याचीही प्रशासनाकडून काळजी घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ध्वनिप्रदूषण टाळा; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य

मिरवणुकीदरम्यान कोणत्याही आक्षेपार्ह बाबींना स्थान देऊ नये. ध्वनिप्रदूषणाबाबत आवश्यक खबरदारी घ्यावी तसेच पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचा वापर करावा. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे गांभीर्याने पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन

जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील यांनी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी, असे सांगितले. सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे. यापूर्वीही नागरिकांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात शांतता राखता आली आहे. सण-उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही, याची प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे त्यांनी आवाहन केले. समाजात शांतता आणि सलोखा कायम राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे चिरकाल टिकणारा आणि सर्वसमावेशक गणेशोत्सव साजरा करूया. कोणतेही धोके पत्करू नयेत तसेच मिरवणुका विनासायास आणि सुरळीतपणे पुढे जातील, याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार

जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांनी उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्णय घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. शासनाकडून उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यात येणार असून, त्यासाठी मंडळांची निवड करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सांख्यिकी अधिकारी गोपाल पानगे यांनी सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेबाबत सविस्तर माहिती दिली.

प्रशासन आणि गणेश मंडळांचा समन्वय

सभेदरम्यान शांतता समितीचे पदाधिकारी आणि गणेश मंडळांच्या सदस्यांनी विविध सूचना व मते मांडली. प्रशासन आणि गणेश मंडळांच्या समन्वयातून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. सभेला सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व नगरपालिका व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, सरपंच आणि पोलीसपाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,527
Please Share
Previous Post

रिमझिम पावसाच्या सरीत रंगला मुशायरा

Next Post

सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पारडीच्या शाळेचा सलग चौथ्यांदा डंका

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पारडीच्या शाळेचा सलग चौथ्यांदा डंका

सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेत पारडीच्या शाळेचा सलग चौथ्यांदा डंका

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

सेलूत देखाव्यांमधून प्रबोधन अन् थरार

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

रामबागचा पर्यावरण संदेश; आदर्श व्यापारी मंडळाचा भूत बंगला सेलू : सेलू शहरातील गणेशोत्सवात यंदा विविध मंडळांनी सामाजिक प्रबोधन आणि थरारक...

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

हिम्मत खचू देऊ नका, सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचा शेतकऱ्यांना धीर परभणी : मागील दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने परभणी जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश...

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

रायपुरात ‘कोण होणार ज्ञानपती’ स्पर्धा उत्साहात

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 24, 2026
0

विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; उपक्रमाचे सर्वत्र कौतुक सेलू, दि. २४ (प्रतिनिधी) : येथे सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त 'कौन बनेगा करोडपती'च्या धर्तीवर शालेय विद्यार्थ्यांसाठी...

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ