देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

अभिनंदन सोहळ्यात ७० गुणवंतांचा सन्मान

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 18, 2026
in परभणी
0
अभिनंदन सोहळ्यात ७० गुणवंतांचा सन्मान
Please Share

सेलूतील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचा उपक्रम

सेलू : येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने गुणवत्ता विकास उपक्रमांतर्गत मार्च २०२६ च्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेत ९० आणि ९० टक्क्यांहून अधिक गुण घेतलेल्या संस्थेतील ७० गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारत त्यांना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोमवार, दिनांक १८ मे २०२६ रोजी नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात हा गुणवंत विद्यार्थी अभिनंदन सोहळा उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रम अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस. एम. लोया हे होते. तर व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, नूतन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नरेंद्र पाटील, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील आणि नूतन कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र, पेन आणि पुष्प देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर आपल्या मनोगतात म्हणाले की, संस्थेने राबविलेला गुणवत्ता विकास उपक्रम, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम, अभ्यासातील सातत्य आणि चिकाटीमुळेच संस्थेतील इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. पण विद्यार्थ्यांनी इथेच न थांबता आपल्या भावी जीवनात अधिक मेहनतीतून निश्चित ध्येय प्राप्त करावे आणि स्वतःसोबतच आपली शाळा, पालक, गाव तसेच नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे नाव मोठे करावे.या कार्यक्रमात प्राची शिंदे, मैथिली गावंडे, आर्या घांडगे, प्रयंती देऊळगावकर या गुणवंत विद्यार्थिनींनी, तसेच रेणूकादास जोशी, नंदा कांगणे, विष्णू सोळंके आणि आसाराम गाडेकर या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले.अभिनंदन सोहळ्याचे प्रास्ताविक सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी यांनी केले. सूत्रसंचालन पर्यवेक्षक बी.डी. घोगरे, प्रा. संजय पिंपळगावकर, राजेंद्र सोनवणे, वंदना चिटणीस आणि गोपाल आम्ले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक नरेंद्र पाटील यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला. कार्यक्रमास नूतन विद्यालय शालेय समितीचे अध्यक्ष सिताराम मंत्री, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, संस्थेतील उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,664
Please Share
Previous Post

परभणी जिल्हा सेपक टकारा निवड चाचणी

Next Post

श्री बालाजी मंदिरात आंबा महोत्सव

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
श्री बालाजी मंदिरात आंबा महोत्सव

श्री बालाजी मंदिरात आंबा महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ