सेलूतील राजस्थानी महिला मंडळाचे आयोजन
सेलू : येथील राजस्थानी महिला मंडळ यांच्या वतीने अधिक मास निमित्त सेलू शहरातील प्राचीन प्रसिद्ध बालाजी मंदिर येथे सोमवारी आंबा महोत्सव साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संपूर्ण बालाजी मंदिराची सजावट आंब्यांनी आणि आंब्याच्या पानांनी करण्यात आली होती. या कार्यक्रमात गीतेचा पंधरावा अध्याय, विष्णुसहस्त्रनाम आणि भजनाचे वाचन करून अधिकमासाचे महात्म्य सांगण्यात आले. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी महिला तसेच बंधूंनी सुद्धा विशेष सहकार्य केले.





