देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

संस्कारी मने घडण्यासाठी जपानुष्ठान आवश्यक

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
May 24, 2026
in महाराष्ट्र
0
संस्कारी मने घडण्यासाठी जपानुष्ठान आवश्यक
Please Share

महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांचे प्रतिपादन

निफाड येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमात भव्य मौन-जपानुष्ठान सोहळा

निफाड जि.नाशिक ( बाबासाहेब हेलसकर) : निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज ( बाबाजी) यांनी श्रमप्रतिष्ठा, भारतीय संस्कृतीची जपणूक आणि संस्कारी मने घडविण्यासाठी आश्रमातून मौन-जपानुष्ठानाची परंपरा सुरू केली. आजही ती अखंडपणे चालू आहे, असे प्रतिपादन भारतातील सर्वात प्राचीन श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष (महाराष्ट्र) श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांनी केले.

श्री नर्मदेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त निफाड येथील भाऊसाहेब नगर साखर कारखाना परिसरातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज आश्रमात १८ मे २०२६ पासून महामंडलेश्वर स्वामी शिवगिरिजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मार्गदर्शनात भव्य मौन-जपानुष्ठान सोहळा सुरू आहे. याशिवाय ज्ञानेश्वरी वाचक रायते महाराज यांच्या उपस्थितीत ज्ञानेश्वरी पारायण, स्वामी शिवगिरी महाराज यांच्या अमृतवाणीतून शिवमहापुराण कथा होत आहे. उपस्थिती मान्यवर महाराज मंडळीचे प्रवचन, आहार प्रवचन, काकडा भजन, हरिपाठ आदी कार्यक्रम होत आहेत.

शुक्रवारी मार्गदर्शन करताना शिवगिरी महाराज यांनी सांगितले की, श्रमांची शेती फुलणार्‍या संत जनार्दन स्वामी यांनी छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अहिल्यानगरासह विविध भागात भगवान महादेवाची उपासना, भक्ती, शिवालये जिर्णोद्धार, उभारणी, अनाथ, गोरगरीबांसाठी गुरूकुल शिक्षण पद्धतीवर भर दिला. भौतिक शिक्षणाला आध्यात्मिक, धार्मिक आणि वैज्ञानिक शिक्षणाची जोड त्यांनी दिली. त्यांचे अनेक कृपा पात्र शिष्य हा वारसा पुढे चालवत आहेत. लाखो भाविक शिवोपासना, साधना, श्रद्धा, भक्ती आणि श्रमसंस्कारांचा अनुभव आजही घेत आहेत, असे त्यांनी सांगितले. शिवमहापुराण कथेचे माहात्म्य सांगताना शिवगिरी महाराज म्हणाले की, शिवमहापुराण कथा ही व्यथा, दुःख याचे निवारण करणारी आहे. कथेत सुंदर चिंतन मांडलेले आहे. महादेवाची श्रद्धेने केलेली भक्ती आणि सद्गुरू यांनी सांगितलेली साधना अंगिकारल्यास जीवन सहज सुंदर होते. जसा आहार तसा विचार आणि पाणी तशी वाणी बनत असते. त्यामुळे याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

भजनी मंडळाच्या साथसंगतीने रंगत

भजनी मंडळाच्या गायन आणि वादनाच्या साथसंगतीने जपानुष्ठान सोहळ्यातील विविध कार्यक्रमांत रंगत भरली आहे. यामध्ये दत्ता महाराज, ईश्वर महाराज, गोपाल महाराज, दीपक महाराज, ज्ञानेश्वर महाराज, सोमनाथ महाराज आदींसह अनेकांचा समावेश आहे.जपानुष्ठानात विशेषत: मोठ्या संख्येने लहान मुलांसह तरूण, नागरिक आणि महिलाही सहभागी झाल्या आहेत.

सोमवारी सोहळ्याची सांगता

अनेक संत महंतांसह पंचक्रोशीतील भाविकांची विविध कार्यक्रमांना मोठी उपस्थिती आहे. अधिक मासात अनेक भाविक अन्नदान, फलदानासाठी पुढे आले आहेत. यामुळे दररोज मोठी अन्नदान सेवा होत आहे. २२ मेपासून लघुरूद्रयाग यज्ञ सुरू झाला. तसेच महिलांनी पार्थीव ( मातीचे) शिवलिंग तयार करून त्याचे पूजन केले. २३ मे रोजी पुरूषोत्तम पूजन झाले. मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. २५ मेरोजी महाप्रसादाने सोहळ्याची सांगता आहे.

Post Views: 1,674
Please Share
Previous Post

श्री बालाजी मंदिरात आंबा महोत्सव

Next Post

अण्णासाहेब जगताप यांना “सरदार पटेल” पुरस्कार

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
अण्णासाहेब जगताप यांना “सरदार पटेल” पुरस्कार

अण्णासाहेब जगताप यांना "सरदार पटेल" पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ