आमदार श्याम खोडे यांचे निर्देश, मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेचा आढावा; पंतप्रधानांच्या जन्मदिनी कामांना सुरुवात करण्याचे नियोजन
वाशिम : मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत मंगरूळपीर व वाशिम विधानसभा मतदारसंघातील शेतपांदण रस्त्यांच्या कामांना गती देण्यासाठी विधानसभा मतदारसंघस्तरीय समितीची आढावा बैठक बुधवार, दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मंगरूळपीर तहसील कार्यालयातील नवीन सभागृहात पार पडली. समितीचे अध्यक्ष तथा आमदार श्यामभाऊ खोडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध शेतपांदण रस्त्यांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
बैठकीस समितीचे सहअध्यक्ष डॉ. सुभाष नानोटे, समिती सदस्य पांडुरंग कोठाळे, बाळू पाटील, विनोद जाधव, गोटे साहेब, भेंडेकर यांच्यासह समितीचे सदस्य सचिव तथा उपविभागीय अधिकारी रवी काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल क्षीरसागर, तहसीलदार पळसकर,मंगरुळपीरचे तहसीलदार अनासुने, मंगरुळपीरचे गटविकास अधिकारी सारिका कारले, वाशिमचे गटविकास अधिकारी सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता चेके, जिल्हा परिषद उपविभागीय अभियंता खोडवे, तालुका कृषी अधिकारी मंगरूळपीर इंगोले, तालुका कृषी अधिकारी वाशिम तसेच भूमिअभिलेख विभागाचे तालुका निरीक्षक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.प्रशासकीय मान्यता व मोजणी झालेल्या रस्त्यांचा आढावाबैठकीदरम्यान मंगरूळपीर तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना मिळालेली प्रशासकीय मान्यता, तसेच तालुका निरीक्षक भूमिअभिलेख कार्यालयामार्फत मोजणी करण्यात आलेल्या शेतपांदण रस्त्यांची सद्यस्थिती याबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. प्रलंबित कामे, प्रस्तावित रस्ते आणि आवश्यक प्रशासकीय कार्यवाही यावरही चर्चा करण्यात आली.शेतकऱ्यांना शेतापर्यंत जाण्यासाठी बारमाही रस्त्यांची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून प्रस्तावित कामांना गती द्यावी, अशा सूचना आमदार श्यामभाऊ खोडे यांनी यावेळी दिल्या.पंतप्रधानांच्या जन्मदिनी कामांना सुरुवात करण्याचे निर्देशपंतप्रधानांच्या जन्मदिवसानिमित्त तालुक्यात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेअंतर्गत मंजूर कामांना प्रत्यक्ष सुरुवात करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश आमदार खोडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.तसेच आगामी सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत प्रत्येक गावात मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ता योजनेची माहिती शेतकरी व ग्रामस्थांपर्यंत पोहोचवावी, योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रस्त्यांची माहिती द्यावी आणि आवश्यक असलेल्या नवीन शेतपांदण रस्त्यांचे प्रस्ताव तयार करण्याबाबत जनजागृती करावी, अशी माहितीही बैठकीत देण्यात आली.शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामांसाठी शेतरस्ते अत्यंत महत्त्वाचे असल्याने, या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावीपणे कार्यवाही करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.बैठकीच्या शेवटी तहसीलदार वाशिम यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
वार्तांकन : फुलचंद भगत, वाशिम





