देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र वाशिम

हवामान अनुकूल शेतीसह मूल्यवर्धनाला गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 2, 2026
in वाशिम
0
हवामान अनुकूल शेतीसह मूल्यवर्धनाला गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न
Please Share

जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मंगरुळपीर तालुक्यात विविध शेती प्रयोगांची केली प्रत्यक्ष पाहणी

फुलचंद भगत/ वाशिम : हवामानातील बदलांशी जुळवून घेत शेती अधिक शाश्वत व उत्पादनक्षम करण्यासाठी शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या विविध प्रयोगांची जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी मंगरुळपीर तालुक्यात प्रत्यक्ष पाहणी केली. विविध गावांतील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून त्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, हवामान अनुकूल शेती, पीक विविधीकरण, फळबाग व्यवस्थापन आणि शेतमालाचे मूल्यवर्धन याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

वनोजा येथे संत्रा क्लिनिंग, ग्रेडिंग व वॅक्सिंग युनिटचे उद्घाटन‘

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – डब्ल्यूडीसी २.०’ अंतर्गत वनोजा येथे ‘आत्मा’मार्फत उत्पादन पद्धतीवर आधारित उभारण्यात आलेल्या सती आई शेतकरी उत्पादक कंपनीच्या संत्रा क्लिनिंग, ग्रेडिंग व वॅक्सिंग युनिटचे उद्घाटन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी त्यांनी कंपनीच्या कृषी अवजारे बँकेची पाहणी करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कृषी यंत्रसामग्री व सुविधांची माहिती घेतली. शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतमालाचे दर्जानुसार वर्गीकरण, मूल्यवर्धन आणि थेट बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर स्थानिक शेतकरी राऊत यांच्या संत्रा फळबागेला भेट देऊन संत्रा उत्पादन, बाग व्यवस्थापन, फळांची गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि विपणन याविषयी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.

शेलू येथे ‘फार्मर ग्रुप लीग’मधील विजेत्या शेतकरी गटांच्या उपक्रमांची पाहणी

शेलू येथे ‘फार्मर ग्रुप लीग’ स्पर्धेतील विजेत्या शेतकरी गटांनी अवलंबलेल्या टोकन पद्धतीने पेरणी, चिकट सापळे, पक्षी थांबे, कामगंध सापळे, प्रकाश सापळे तसेच विविध हवामान अनुकूल कृषी तंत्रज्ञानाची जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीतही शाश्वत उत्पादन व उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी अवलंबलेल्या पद्धतींची त्यांनी माहिती घेतली. शेतकरी गटांच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा सामूहिक वापर, अनुभवांची देवाणघेवाण आणि शाश्वत शेतीचा प्रसार होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. शेतीविषयक मार्गदर्शनासाठी उपलब्ध असलेल्या ‘महाविस्तार एआय’ आणि ‘वसुधा टेलिफोन सुविधा’ याबाबत शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया व अनुभवही त्यांनी जाणून घेतले.

पुरस्कारप्राप्त शेतकऱ्याच्या शेतावर पीक विविधीकरणाची पाहणी

‘शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’प्राप्त शेतकरी केशवराव भगत यांच्या शेताला जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली. भगत यांनी आपल्या शेतात ११ प्रकारच्या विविध भाज्यांची लागवड करून पीक विविधीकरणाच्या माध्यमातून उत्पन्नाचे नवनवीन स्रोत निर्माण केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी भाजीपाला उत्पादनाचे नियोजन तसेच एकात्मिक फळबाग विकास अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या फळबागेची पाहणी केली. कमी क्षेत्रातून विविध पिकांचे दर्जेदार उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयोगांचे जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

शेतकऱ्यांच्या नव्या प्रयोगांना प्रशासनाची साथ

हवामान अनुकूल शेती तंत्रज्ञानाचा वापर, पीक विविधीकरण, फळबाग व्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पादन व उत्पन्न वाढविण्याच्या प्रयत्नांना या पाहणीदौऱ्यातून मोठा दिलासा व प्रोत्साहन मिळाले. या पाहणी दौऱ्यादरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा महाबळे, तालुका कृषी अधिकारी आकाश इंगोले, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप गुट्टे यांच्यासह विविध विभागांचे क्षेत्रीय अधिकारी आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post Views: 1,323
Please Share
Previous Post

नूतन विद्यालयाच्या ‘एआय जादूचा दिवा’ नाटकाला प्रेक्षकांची दाद

Next Post

खरीप २०२६ दुष्काळ गंभीर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
खरीप २०२६ दुष्काळ गंभीर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा

खरीप २०२६ दुष्काळ गंभीर राष्ट्रीय आपत्ती घोषित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ