सेलू : शहरात गुरुपौर्णिमेनिमित्त दिनांक २९ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान आर्ट ऑफ लिविंगतर्फे आयोजित आनंद अनुभूती शिबिराचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप झाला.
या शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक किशोर घडे व अंकुश गरड यांनी शिबिरार्थींना मार्गदर्शन केले.शिबिरादरम्यान तणावमुक्त आणि आनंदी जीवन कसे जगावे, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. शिबिर पूर्ण केल्यानंतर मनातील अनामिक भीती दूर झाली असून आत्मविश्वास खूप वाढला आहे, अशा भावना शिबिरार्थींनी व्यक्त केल्या.या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संजय ठाकूर, रामा वैद्य, मनीषा वैद्य, हर्षता चेचेडिया, बाळासाहेब सोनटक्के, ज्ञानेश्वर मोगल आदींनी विशेष परिश्रम घेतले.





