देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in परभणी
0
राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा
Please Share

१४ वर्षांनंतर जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांचे परभणी जिल्हा बँकेत पुनरागमन, अध्यक्षपदाची धुरा

परभणी | प्रतिनिधी : “सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो; काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात!” या आशयाचे राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची आज परभणी जिल्ह्यात मोठी चर्चा रंगली. या स्टेटसनंतर काही वेळातच भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने या संदेशाकडे राजकीय वर्तुळातून विशेष लक्ष वेधले गेले.

तब्बल १४ वर्षांनंतर रामप्रसाद बोर्डीकर यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वावर पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या रामप्रसाद बोर्डीकर यांनी यापूर्वी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची जबाबदारीही यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक चढ-उतार आले. मध्यंतरीच्या काळात विरोधकांकडून विविध आरोप व कटकारस्थानांद्वारे त्यांची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र, त्या सर्व आव्हानांना समर्थपणे तोंड देत त्यांनी आपले राजकीय अस्तित्व कायम ठेवले आणि पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले.या राजकीय पुनरागमनात राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांचे योगदानही महत्त्वाचे मानले जात आहे. संघटन मजबूत करणे, कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्क ठेवणे आणि जिल्ह्यातील राजकीय समीकरणे प्रभावीपणे हाताळणे यामुळे बोर्डीकर कुटुंबाचे नेतृत्व अधिक बळकट झाल्याचे समर्थकांचे मत आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री श्रीमती मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसमधील “सगळ्याच शर्यतीत भाग घ्यायचा नसतो; काही शर्यती शांत बसून जिंकायच्या असतात!” या ओळींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. संयम, योग्य वेळेची प्रतीक्षा आणि निर्णायक विजयाचा संदेश देणारे हे स्टेटस आजच्या घडामोडींशी जोडले जात असून, त्याची जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू आहे. रामप्रसाद बोर्डीकर यांच्या बिनविरोध निवडीमुळे परभणी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात नव्या पर्वाची सुरुवात झाल्याची भावना समर्थक व्यक्त करत आहेत.

Post Views: 1,728
Please Share
Previous Post

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

Next Post

Art of Living : आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
Art of Living : आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

Art of Living : आनंद अनुभूती शिबिर उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ