देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 3, 2026
in महाराष्ट्र
0
जिद्दीला सलाम ! IDBI BANK : ७५ टक्के दृष्टीहीन दिनेश फुके यांची ‘असिस्टंट मॅनेजर’पदी भरारी
Please Share

वाशीम जिल्ह्यातील भूमिपुत्राने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवली पदोन्नती

वाशीम (फुलचंद भगत) : प्रबळ इच्छाशक्ती, अथक परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर कोणत्याही संकटावर मात करता येते, हे वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील चांभई येथील भूमिपुत्र दिनेश भास्कर फुके यांनी सिद्ध करून दाखवले आहे. ७५ टक्के दृष्टीहीन असूनही त्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर आयडीबीआय (IDBI) बँकेत ‘असिस्टंट मॅनेजर’ या मानाच्या पदावर पदोन्नती मिळवली आहे.

ते वाशीम येथील रिसोड नाका, पारस प्लाझा कॉम्प्लेक्स मधील बँकेच्या शाखेत आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारत आहेत. गेल्या एका दशकापासून स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात संघर्ष करणाऱ्या दिनेश यांनी तीन वर्षांपूर्वी याच बँकेत ‘एक्झिक्युटिव्ह सीएसई’ पदावर यश मिळवले होते. त्यानंतर ते वैजापूर येथील शाखेत अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत होते. त्यांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आता त्यांना थेट ‘असिस्टंट मॅनेजर’ म्हणून बढती देण्यात आली आहे. या यशाबद्दल त्यांना व कुटुंबाला सार्थ अभिमान वाटत आहे.

खडतर तरीही प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास

दिनेश यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर राहिला. त्यांनी पहिली ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतचा टप्पा मोठ्या जिद्दीने गाठला. १ली व २री प्राथमिक शाळा चांभई, ३री ते ६वी कै. गोबरा नाईक अंधनिवासी विद्यालय वाशीम, ७वी डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंधविद्यालय अमरावती, ८वी ते १०वी भारतीय ज्ञानपीठ विद्यालय मूर्तीजापूर, ११वी व १२वी व्ही. एन. कॉलेज मंगरूळपीर, पदवी (B.A.) सीताबाई कला महाविद्यालय अकोला, तर इतिहास विषयात पदव्युत्तर शिक्षण (M.A.) अमरावती विद्यापीठांतर्गत पूर्ण केले. याशिवाय तांत्रिक शिक्षणात एम-एससीआयटी आणि बेसिक कम्प्युटर टायपिंगचे प्रशिक्षण नाशिक येथील केंद्रात पूर्ण केले.

वडिलांकडून मिळालेला समाजसेवेचा वारसा

दिनेश यांच्या आई श्रीमती निर्मला भास्कर फुके या गावाच्या सरपंच होत्या, मात्र विकासाची आणि समाजसेवेची संपूर्ण कामे त्यांचे वडील पाहत असत. आज वडील हयात नसले तरी, त्यांनी दिलेला समाजसेवेचा वारसा दिनेश अविरतपणे पुढे चालवत आहेत. त्यांना रुग्णसेवेची मनापासून आवड असल्याने गेल्या पाच वर्षांत त्यांनी ५० हून अधिक रक्तदान शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. भविष्यात शिक्षणापासून वंचित असलेल्या दृष्टीहीन मित्र-मैत्रिणींसाठी विशेष कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे. याशिवाय त्यांना बुद्धिबळ आणि क्रिकेट खेळण्याचीही विशेष आवड आहे.

या यशाचे श्रेय देताना दिनेश यांनी कुटुंबाचे व मदतीला धावून आलेल्या व्यक्तींचे विशेष आभार मानले आहेत. शिक्षणासाठी काबाडकष्ट करणारी आई आणि भाऊ संदीप भास्कर फुके यांच्या त्यागामुळेच हे यश मिळाल्याचे ते आवर्जून सांगतात. वडिलांच्या निधनानंतर खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे आतेभाऊ गणेश भास्कर वक्ते यांचेही त्यांनी आभार मानले. तसेच, अभ्यासाच्या काळात ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी मदत करणाऱ्या ‘क्षितिज विरंगुळा केंद्र’ (अकोला) च्या मंजुश्री गोविंद कुलकर्णी, अवांतर पुस्तकांचे रेकॉर्डिंग करून देणारे चांभईचे प्रफुल तुळशीराम फुके आणि परीक्षेच्या वेळी ‘लेखनिक’ म्हणून मदत करणारे मयूर सुरेश राऊत, आशिष महादेव बरड, सागर नंदू वानखडे, ओमशांती पांडुरंग खंडारे, अमर गजानन कांबे यांचे आभार मानले. याशिवाय विशेष सहकार्य करणारे पांडुरंग कोठाळे, पांडुरंग खंडारे, राम सुर्वे, योगेश मिटकरी, हरिश्चंद्र ठाकरे व सर्व सहकारी मदत करणाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.

Post Views: 1,745
Please Share
Previous Post

जायकवाडीच्या डाव्या कालव्यातून तातडीने पाणी सोडा

Next Post

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या व्हॉट्सॲप स्टेटसची चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ