देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

अणुऊर्जा विभाग संचालकांनी घेतला लिगो प्रकल्पाचा आढावा

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
July 29, 2026
in मराठवाडा
0
अणुऊर्जा विभाग संचालकांनी घेतला लिगो प्रकल्पाचा आढावा
Please Share

परभणी/प्रतिनिधी : हिंगोलीतील औंढा नागनाथ तालुक्यात प्रस्तावित लिगो इंडिया प्रकल्पास अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे यांनी नुकतीच भेट दिली. दरम्यान, लिगो प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस अणुऊर्जा संशोधन व विकास विभागाचे संचालक नितीन जावळे, लिगो इंडिया प्रकल्प समन्वयक समीर जाधव, जिल्हा खनिकर्म अधिकारी आश्विनकुमार माने, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक रविंद्र पत्की, सहाय्यक संचालक (नगर रचना विभाग) तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. याशिवाय लिंबाळा एमआयडीसी उद्योग समूह संघटनेचे ज्ञानेश्वर मामडे, प्रविण सोनी, नितीन राठोड, रमेश पंडित तसेच जिल्ह्यातील स्टोन क्रशर उद्योजकही बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत लिगो इंडिया प्रकल्पाच्या सीमारेषेपासून ५, १५, ३० आणि ६० किलोमीटर परिसरात लागू असलेल्या विविध निर्बंधांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. स्टोन क्रशर, खाणकाम, ब्लास्टिंगवर आधारित उद्योग, २० अश्वशक्तीपेक्षा अधिक ऊर्जा लागणारे रेसिप्रोकेटिंग क्रियाकलाप, नवीन वीज प्रकल्प, नवीन रेल्वे मार्ग तसेच पवनचक्की उभारणीवरील निर्बंधांबाबत सखोल चर्चा करण्यात आली.हिंगोली जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळावी, यासाठी लिगो इंडिया प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत संबंधित निर्बंध शिथिल करण्यात यावेत तसेच काही निर्बंधांमध्ये अंशतः सूट देण्यात यावी, अशी विनंती जिल्हा प्रशासन व उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आली. यावर संचालक नितीन जावळे यांनी जिल्हा प्रशासन व उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांवर लिगो इंडिया एम्पावर्ड बोर्डाच्या बैठकीत सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या दौऱ्यादरम्यान नितीन जावळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासमवेत लिंबाळा एमआयडीसी परिसरातील कीर्ती गोल्ड, शिवपार्वती ऑईल मिल तसेच पंचतत्त्व उद्योगांना भेट देऊन उत्पादन प्रक्रिया, बाटली निर्मिती व पाणी शुद्धीकरण प्रक्रियेची पाहणी केली.

Post Views: 1,378
Please Share
Previous Post

भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची : आषाढी वारीत ७.२३ लाखांहून अधिक वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा

Next Post

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणासाठी २९ ते ३१ जुलैदरम्यान विशेष ग्रामसभांचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ