देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

बाल विद्यामंदिर, नूतन, गांधी विद्यालय विजेते

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
February 28, 2026
in परभणी
0
बाल विद्यामंदिर, नूतन, गांधी विद्यालय विजेते
Please Share

विज्ञान दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा, सेलूतील प्रिन्स स्कूलचे आयोजन

विद्यार्थ्यांनी संशोधनवृत्ती जोपासावी : डॉ.संजय रोडगे

सेलू : सेलू येथील क्युरिऑसिटी सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर आणि एल.के.आर.रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय क्विझ स्पर्धेत २५ शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात बालविद्यामंदिर परभणीच्या होमी भाभा टीमने प्रथम, नूतन विद्यालय सेलूच्या ए. पी. जे. अब्दुल कलाम टीमने द्वितीय, तर गांधी विद्यालय परभणीच्या अल्बर्ट आइन्स्टाईन टीमने तृतीय क्रमांक पटकावला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सर सी. व्ही. रमन यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. अध्यक्षस्थानी श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विज्ञान हे केवळ पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनातील प्रत्येक क्षेत्राशी निगडित असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना संशोधनवृत्ती जोपासण्याचे आवाहन केले.उद्घाटक ज्येष्ठ विज्ञान संचारक व्ही. बी. रायगावंकर यांनी विज्ञानातील जिज्ञासेचे महत्त्व सांगत प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान समजावून घेण्याची गरज व्यक्त केली. प्रमुख पाहुण्या श्रेया गाथ यांनी डेटा सायन्स क्षेत्रातील अनुभव सांगत करिअरसाठी गणित व विज्ञानातील पाया भक्कम करण्याचे मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विठ्ठल सरकटे यांनी केले. यावेळी मंचावर डॉ. सविता रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, मुख्याध्यापक कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर, हरिभाऊ कांबळे, कैलास ताठे, शालिनी शेळके, अशोक बोडके आणि मीनाक्षी रत्नपारखी यांची उपस्थिती होती.राज्यस्तरीय क्विझ स्पर्धेत २५ शाळांमधील १०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात बालविद्यामंदिर परभणीच्या होमी भाभा टीमने प्रथम, नूतन विद्यालय सेलूच्या ए. पी. जे. अब्दुल कलाम टीमने द्वितीय, तर गांधी विद्यालय परभणीच्या अल्बर्ट आइन्स्टाईन टीमने तृतीय क्रमांक पटकावला. तसेच के. बी. स्कूल सेलूच्या कल्पना चावला टीमला आणि ज्ञानतीर्थ विद्यालयाच्या सत्येंद्रनाथ बोस टीमला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. प्रश्नमंजुषा स्पर्धेचे सूत्रसंचालन प्रगती क्षीरसागर यांनी केले. सप्ताहात रोबोटिक कार्यशाळा, ३डी विज्ञान शो आणि विज्ञानावर आधारित नाटिकेशी सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप आकत, दिगंबर टाके आणि संजय ठाकर यांनी केले.

राज्यस्तरीय विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा : विजेते संघ * प्रथम क्रमांक : होमी भाभा टीम, बालविद्यामंदिर, परभणी (३०००/- रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र) * द्वितीय क्रमांक : ए. पी. जे. अब्दुल कलाम टीम, नूतन विद्यालय, सेलू (२०००/- रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र) * तृतीय क्रमांक : अल्बर्ट आइन्स्टाईन टीम, गांधी विद्यालय, परभणी (१०००/- रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र) * उत्तेजनार्थ पारितोषिक १ : कल्पना चावला टीम, के. बी. स्कूल, सेलू (५००/- रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र) * उत्तेजनार्थ पारितोषिक २ : सत्येंद्रनाथ बोस टीम, ज्ञानतीर्थ विद्यालय (५००/- रुपये रोख, ट्रॉफी व प्रमाणपत्र)

Post Views: 1,517
Please Share
Previous Post

प्रिन्स इंग्लिश स्कूलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

महात्मा फुले विद्यालयात विज्ञान दिन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

स्व.अनंत लेवडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वितरण

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

डिग्रस वाडी येथे अभिवादन कार्यक्रम उत्साहात, नामफलकाचे अनावरण सेलू : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बलिदान देणारे मराठा हुतात्मा स्व....

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

श्री पेडा हनुमान मंदिरात श्रीराम कथा सोहळ्यास प्रारंभ

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

पंडित निर्मलकुमार शुक्ला यांच्या रसाळ वाणीतून वाल्मीकि रामायण निरूपण परभणी : शहरातील स्टेशन रोडवरील श्री पेडा हनुमान मंदिरात ४ ते...

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

अंबिका डहाळे यांची मनपा स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

परभणी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला जिल्हाप्रमुख अंबिका अनिल डहाळे यांची परभणी शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती झाली...

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

पोलीस पाल्य करिअर शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

by देशनिष्ठ वृत्तसेवा
August 5, 2026
0

स्पर्धा परीक्षांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन; २५० हून अधिक विद्यार्थी लाभार्थी वाशिम (फुलचंद भगत) : जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने नवीन पोलीस...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ