देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा

भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
December 28, 2025
in मराठवाडा
0
भाईजींच्या व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष
Please Share

स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

‘बुलडाणा अर्बन’चे राधेश्याम चांडक यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जगन्नाथ पुरी धाम येथे सन्मान

सेलू जि.परभणी : जगन्नाथ पुरी येथील श्रीमद् भागवत महापुराण कथेच्या मंडपात ‘बुलडाणा अर्बन’चे संस्थापक राधेश्याम देवकिशन चांडक उर्फ भाईजी यांचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘अमृत प्रसाद’ सन्मान सोहळा २७ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात पार झाला. यावेळी स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी आशीर्वचन देताना भाईजींचे जीवन व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी वस्तुपाठ असून त्यांच्या सामान्य व्यक्तिमत्वात असामान्य महापुरुष दडलेला असल्याचे नमूद केले.

या वेळी आयोजक नंदकिशोर झंवर (रिसोड), डॉ.विनोद मंत्री (परभणी), नंदकिशोर बाहेती (सेलू), कीर्ती व मनीष कासट, कोमल व डॉ.सुकेश झंवर, रमेशचंद्र चांडक, शिवनारायण बाहेती, रामवल्लभ बाहेती, कल्पना मंत्री, सुनीता झंवर, कांचन बाहेती, रमा बाहेती, महेश, चेतन, श्याम, संजना, रितू, श्रीषा बाहेती आणि झंवर व मंत्री परिवारातील सदस्य उपस्थित होते.स्वामीजींच्या हस्ते मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल, श्रीफळ, कंठमणी हार व पगडी देऊन भाईजींना सन्मानित करण्यात आले.

स्वामीजी म्हणाले की, शालेय जीवनात अर्थशास्त्र व इंग्रजी विषयात अपयशी ठरलेल्या भाईजींनी आज अर्थ आणि सहकाराच्या माध्यमातून १८ लाख सभासदांचे जीवन प्रकाशमान केले आहे. अनेक इंग्रजी, सेमी इंग्रजी माध्यमाच्या शिक्षण संस्था उभ्या केल्या. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी रागावर मिळवलेले नियंत्रण आणि त्यांचे सेवामय जीवन नवीन पिढीसाठी प्रेरणादायी, आदर्शवत आहे.

वेद कार्यास २५ लाखांची मदत

या प्रसंगी बुलडाणा अर्बन परिवार आणि सहकार विद्यालयाच्या वतीने भाईजींच्या जीवनावरील ‘समर्पण’ ग्रंथाचे प्रकाशन झाले. ‘अमृत प्रसाद’ ध्वनी चित्रफित प्रदर्शित करण्यात आली. चित्रफितची संकल्पना प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, संकलन प्रा.प्रकाश कुरूंदकर व देविदास ढेकळे यांचे असून निवेदन कीर्ती राऊत व डॉ.सुरेश हिवाळे यांनी केले. झंवर परिवारातर्फे धान्य तुला करण्यात आली. राधेश्याम चांडक परिवारातर्फे ४८ वेद विद्यालय, धर्मश्री प्रतिष्ठान आणि वेदश्री तपोवन या संस्थांना एकूण २५ लाख रुपयांची देणगी देण्यात आली.

क्रोधाचा त्याग आवश्यक : राधेश्याम चांडक सत्काराला उत्तर देताना भाईजी म्हणाले की, केवळ स्वतःसाठी न जगता समाजासाठी दिलेले योगदान जीवनगाथा मोठी करते. बुलडाणा अर्बन ही २६ हजार कोटींची संस्था आणि २२ शाळा हे केवळ विश्वासावर उभे आहेत. वेळेचे अचूक नियोजन, दिलेला शब्द पाळणे आणि क्रोधावर नियंत्रण ही यशाची तीन सूत्रे त्यांनी सांगितली. रागामुळे नाती उद्ध्वस्त होतात, म्हणून सुखी संसारासाठी क्रोधाचा त्याग करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Post Views: 1,941
Please Share
Previous Post

‘गजर माऊलीचा’ महानाट्याने जिंकली मने

Next Post

ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे

ग्रामीण साहित्य वेदनेची कळ मारण्यासाठीच असतं : आसाराम लोमटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

मुक्तीसंग्रामातून त्याग, शौर्याची प्रेरणा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

प्रा.किरण सोनटक्के यांचे प्रतिपादन, रायरेश्वर विद्यालयात ध्वजारोहण उत्साहात परभणी : जुलमी आणि हुकूमशाही निजाम सत्तेविरोधातील मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा इतिहास जाज्वल्य आहे....

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

ध्वजारोहणाच्या सन्मानाने ग्रामसखींमध्ये उत्साह

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

सेलू पंचायत समितीचा ४९ ग्रामपंचायतीमध्ये अभिनव उपक्रम सेलू : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पंचायत समिती सेलूच्या वतीने तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये ‘उमेद’...

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

उभ्या सोयाबीनमध्ये सोडल्या शेळ्या

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

दुष्काळामुळे रायपूर शिवारातील शेतकरी हतबल सेलू : पावसाने पाठ फिरवल्यामुळे पिके पूर्णपणे करपून गेल्याने दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या सेलू (जि.परभणी)...

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

जायकवाडी कालव्यात अनधिकृत हस्तक्षेपास मनाई

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 17, 2026
0

१६ ऑक्टोबरपर्यंत परभणीत प्रतिबंधात्मक आदेश परभणी : खरीप हंगाम २०२६-२७ मध्ये जायकवाडी प्रकल्पाच्या मुख्य कालवा, शाखा कालवे, वितरिका व लघुवितरिकांमधून...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ