देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा जालना

एकाच रस्त्यावर दोन ग्रामपंचायतींनी उचलले अनुदान !

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 11, 2026
in जालना
0
एकाच रस्त्यावर दोन ग्रामपंचायतींनी उचलले अनुदान !
Please Share

पांदण रस्त्यात कोट्यवधींचा भ्रष्टाचार; मंठा तालुक्यातील धक्कादायक प्रकार

मंठा (जि.जालना) : मंठा तालुक्यातील नानसी आणि मंगरूळ या दोन गावादरम्यानच्या मातोश्री पांदण रस्त्याच्या कामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. एकाच रस्त्यावर दोन्ही ग्रामपंचायतींनी काम दाखवून शासनाच्या निधीची विल्हेवाट लावल्याचे उघडकीस आले असून, या प्रकरणी ८ सप्टेंबर २०२६ रोजी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सखोल चौकशीसह कारवाईची दाद मागितली आहे.

तक्रारीनुसार, सन २०१८ मध्ये लोअर दुधना प्रकल्पाच्या यांत्रिकी विभागाकडून पाच किलोमीटर अंतराचा हा रस्ता मुरुमीकरण करून आधीच तयार करण्यात आला होता. तरीही याच रस्त्यावर मंगरूळ ग्रामपंचायतीने दोन किलोमीटर आणि नानसी ग्रामपंचायतीने दोन किलोमीटर असे चार किलोमीटरचे मातोश्री पांदण रस्त्याचे काम परस्पर दाखवले. एकाच रस्त्याची डावी व उजवी बाजू दाखवून कागदोपत्री दोन स्वतंत्र कामे मंजूर करून घेण्यात आली.

प्रत्यक्षात पाहणी केली असता रस्त्याचे काम जेमतेम अडीच किलोमीटर भरत असून, दीड किलोमीटरचे काम झालेच नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच रस्त्यावर दर किलोमीटरला १५ याप्रमाणे चार किलोमीटर अंतरासाठी एकूण ६० सिमेंट पाईप मंजूर असताना, प्रत्यक्षात जागेवर एकही पाईप टाकलेला नाही. माहिती अधिकारात काढलेल्या कागदपत्रांमध्ये मूळ नस्तीत जिओ टॅगिंगचे फोटो, माहिती फलकाचे छायाचित्र, तहसीलदार तसेच कृषी अधिकाऱ्यांचे नाहरकत प्रमाणपत्र उपलब्ध नाही. एवढेच नव्हे, तर संमतीपत्रावर दुसऱ्याच शेतकऱ्यांची नावे व स्वाक्षऱ्या असून अनेक कागदपत्रांवर केवळ कोऱ्या पानांवर सह्या-शिक्के मारल्याचे दिसून आले आहे.

या गैरव्यवहाराबाबत उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांनी पूर्वी चौकशी आदेश दिले होते. मात्र, स्थानिक समितीने घटनास्थळी कोणतीही पाहणी केली नाही. ग्रामसेवक, इंजिनिअर व कंत्राटदाराने संगनमत करून कोणतीही प्रत्यक्ष पाहणी न करता बिले काढल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कामाची प्रत्यक्ष जागेवर मोजणी करून संबंधित दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ज्ञानोबा निर्वळ, जायकू निर्वळ, रंगनाथ निर्वळ, अशोक निर्वळ, आबासाहेब निर्वळ, डिगांबर निर्वळ, दत्तराव निर्वळ, दिलीप निर्वळ यांच्यासह परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.

Post Views: 1,432
Please Share
Previous Post

चला शाळेत जाऊया अभियान : संचालक डॉ.वसेकर यांनी विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद

Next Post

दीड वर्षात सेलूतील रेल्वे उड्डाणपुलाला आकार; जमीन मोजणी सुरू

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
दीड वर्षात सेलूतील रेल्वे उड्डाणपुलाला आकार; जमीन मोजणी सुरू

दीड वर्षात सेलूतील रेल्वे उड्डाणपुलाला आकार; जमीन मोजणी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

राष्ट्रीय मानांकनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयाची निवड

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 13, 2026
0

दर्जेदार आरोग्य सुविधांसाठी राज्य मूल्यांकनात बाजी सेलू : सार्वजनिक आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'राष्ट्रीय गुणवत्ता...

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

सेलूतील डॉ.झाकीर हुसेन शाळेत पुरस्कार सोहळा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

‘सीरत-ए-मुस्तफा’ निमित्त गुणवंत शिक्षकांसह माजी विद्यार्थ्यांचा गौरव सेलू : परभणी एज्युकेशन सोसायटी संचालित डॉ. झाकीर हुसेन प्राथमिक शाळा सेलू येथे...

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

ज्ञानेश्वरी प्रवचनमालेची उत्साहात सांगता

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

श्रावणमासातील आध्यात्मिक जागराची २२ वर्षांची परंपरा सेलू : सेलू येथील श्री केशवराज बाबासाहेब महाराज संस्थान आणि श्री ज्ञानेश्वरी आराधना प्रतिष्ठान...

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

राष्ट्रीय लोकअदालत :‌ एका पक्षकारास ९० लाखांचा धनादेश सुपूर्द

by देशनिष्ठ वृत्तसेवा
September 12, 2026
0

परभणी, हिंगोली जिल्ह्यातील प्रकरणांचा यशस्वी निपटारा परभणी : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, परभणीच्या वतीने १२ सप्टेंबर, २०२६ रोजी परभणी व...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ