देशनिष्ठ
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login
No Result
View All Result
देशनिष्ठ
No Result
View All Result
Home Uncategorized मराठवाडा परभणी

जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला

देशनिष्ठ वृत्तसेवा by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 5, 2026
in परभणी
0
जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा भोवला
Please Share

सात कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल

परभणी : राष्ट्रीय कर्तव्य असलेल्या जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा आणि आदेशाचे उल्लंघन करणे ७ कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. जनगणना पर्यवेक्षक आणि प्रगणक म्हणून नियुक्ती होऊनही कर्तव्यावर हजर न राहिल्याबद्दल या सातही जणांविरुद्ध नवा मोंढा ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मनपाच्या जनगणनाचे चार्ज अधिकारी सय्यद आवेस हाश्मी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार फिर्याद दिली. आगामी राष्ट्रीय जनगणनेच्या कामासाठी वरील ७ कर्मचाऱ्यांची जनगणना पर्यवेक्षक आणि जनगणना प्रगणक म्हणून अधिकृत नियुक्ती केली होती. त्यांना राष्ट्रीय जनगणनेच्या कामात तत्काळ हजर राहण्याचे आदेश प्रशासनातर्फे देण्यात आले होते. मात्र, २५ एप्रिल ते ३ जून या कालावधीत आदेश देऊनही गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खालील शिक्षकांचा व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात मोहम्मद सनाउल्लाखान समिउल्ला खान (फातेमा हायस्कुल, रहमत नगर, परभणी), प्रभाकर वसंतराव भोंडवे (मातोश्री धोंड्याबाई प्रायमरी स्कूल, लोणी, ता. पाथरी), प्रशांत प्रल्हादराव रेंगे (नूतन प्राथमिक शिक्षणालय, परभणी), अनंत किशनराव किरडे (श्री छत्रपती शाहू प्रायमरी स्कूल, परसावत नगर, परभणी), जब्बार अली खान रफतअली खान (अलकरिम हायस्कुल, मदिना नगर, परभणी), गोविंद रामकिशन रोडे (कै. हरिबाई वरपुडकर ज्यु. कॉलेज, पेडगाव, परभणी), लोहट सचिन मुरलीधर (मांडव्यऋषी विद्यालय, मांडाखळी) हे कर्मचारी प्रभाग समिती ‘क’ कल्याण मंडपम येथे हजर झाले नाहीत. त्यांनी राष्ट्रीय कर्तव्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने कायदेशीर पाऊल उचलले.
सय्यद आवेस हाश्मी सयद अजगर हाश्मी वय 51 वर्ष व्यवसाय नौकरी (अधिक्षक तथा चार्ज अधिकारी जनगनणा 2027 प्रभाग समिती (क) कल्याण मंडपम, परभणी शहर महानगरपालीका यांनी तक्रार दिली आहे त्यानुसार 2026/जनगणना / 52/2026 दिनाक 03/06/2026 अन्वये परभणी शहर महानगर पालीका परभणी यांचे कर्मचारी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास कसुर केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे बाबतचा आदेश दिल्याने वरिष्ठाचे आदेशाने फिर्याद देत आहे.

फिर्याद :

मी परभणी शहरातील सी झोन प्रभाग समीती (क) चे जनगणना चार्ज अधिकारी म्हणुन काम पाहतो. दि. 03/05/2026 ते दि.05/05/2026 असे पोतदार इंटरनॅशनल स्कुल जिंतुर रोड परभणी येथे तिन दिवस प्रशिक्षण ठेवले होते. परंतु सदर प्रशिक्षणामध्ये 1) श्री मोहमंद सनाउल्लाखान समिउल्ला खान रा फातेमा हायस्कुल रहमत नगर परभणी यांची व 2) प्रभाकर वसंतराव भोंडवे रा मातोश्री धोंड्याबाई प्रायमरी स्कुल लोणी. ता. पाथरी जि परभणी 3) प्रशांत प्रल्हादराव रेंगे, नुतन प्राथमीक शिक्षणालय परभणी 4) अनंत किशनराव किरडे, श्री. छत्रपती शाहू प्रायमरी स्कुल परसावत नगर, परभणी 5) श्री. जब्बार अली खान रफतअली खान अलकरिम हायस्कुल मदिना नगर, परभणी,, 6) श्री. गोविंद रामकिशन रोडे रा. कै. हरिबाइ परपुडकर ज्यु, कालेज, पेडगाव, परभणी 7) श्री. लोहट सचिन मुरलिधर रा. मांडाव्याऋषी विदयालय मांडाखळी, परभणी हे गैरहजर होते. म्हणुन त्यांना मी दि. 05/05/2026 रोजी नोटीस काढुन त्यांना नोटीस देण्यासाठी शिपायामार्फत पाठविली होती व दोन ते तिन वेळेस शिपाई सदर ठिकाणी जावुन शाळा बंद असल्याने त्यांना नोटीस देता आली नाही म्हणुन दि. 18/05/2026 रोजी स्पीड पोस्टाने पाठविली होती.
दिनाक 25/04/2026 रोजी सकाळी 11.00 ते दिनांक 03/04/2026 रोजीचे 11.00 रोजी पोवतो जनगणना पर्यवेक्षक म्हणुन 1) श्री. मोहमंद सनाउल्लाखान समिउल्ला खान रा. फातेमा हायस्कुल रहमत नगर परभणी यांची व 2) प्रगणक प्रभाकर वसंतराव भोंडवे रा मातोश्री धोंड्याबाइ प्रायमरी स्कुल लोणी ता पाथरी जि परभणी 3) प्रशांत प्रल्हादराव रेंगे नुतन प्राथमीक शिक्षणालय परभणी 4) अनंत किशनराव किरडे, 5) श्री. जब्बार अली खान रफतअली खान, 6) श्री. गोविंद रामकिशन रोडे 7) श्री. लोहट सचिन मुरलिधर या सर्वाची प्रगणक म्हणुन नेमणुक केली होती व कर्तव्यावर पोतदार इंटरनॅशनल स्कुल जिंतुर रोड परभणी येथे हजर रहावे असे आदेशित करुन सुध्दा ते अदयाप पावेतो जनगणनेच्या कामासाठी हजर झाले नाहीत. सदरील कर्मचारी यांनी राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास कसुर केला आहे. त्यांच्या विरुध्दात गुन्हा नोंदविण्यासाठी मा. आयुक्त मोहदय यांनी मला प्राधिकृत केले. म्हणुन माझी वरील नमुद कर्मचारी यांच्या विरूध्द राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यास कसुर केला म्हणुन माझी कलम 223 भारतीय न्याय संहिता सह कलम 32 लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950,1951,1989 प्रमाणे सरकार तर्फे र्फियाद आहे.

Post Views: 1,423
Please Share
Previous Post

पांढरा कोड रुग्णांना मोठा दिलासा

Next Post

मिरगाच्या कवितांनी जिंकली रसिकांची मने

देशनिष्ठ वृत्तसेवा

देशनिष्ठ वृत्तसेवा

Next Post
मिरगाच्या कवितांनी जिंकली रसिकांची मने

मिरगाच्या कवितांनी जिंकली रसिकांची मने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

सज्जन संगतीने मनुष्याचा उध्दार : पद्मनाभ महाराज व्यास

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 18, 2026
0

साईबाबा मंदिरात श्रीमद्भागवत कथा सेलू : दुष्कर्माने आयुष्य लहान होते. मनाच्या स्थिरतेसाठी माणसाने वासनेपासून दूर राहावे.चंचल मनावर संस्कार, सद्विचाराने अंकुश...

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

भारतीय संस्कृती वैश्विक कल्याणाचा संदेश देते

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

ह.भ.प. पद्मनाभ महाराज व्यास यांचे प्रतिपादन, श्रीसोनामाय प्रतिष्ठानच्या श्रीमद् भागवत कथा सप्ताहास मोठा प्रतिसाद सेलू : सृष्टीतील सर्व जिवात्मे समान...

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

आयुर्वेदिक ॲक्यूप्रेशर थेरपी शिबिराचे आयोजन

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

सेलूतील ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचा उपक्रम सेलू : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शाखा सेलू येथे जगदंबा मातेश्वरीजी यांच्या स्मृती...

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

उपवर्गीकरणाविरोधात सेलूमध्ये धडक मोर्चा

by देशनिष्ठ वृत्तसेवा
June 16, 2026
0

आंबेडकरी नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन सेलू जि.परभणी : महाराष्ट्र शासनामार्फत अनुसूचित जातींमध्ये आरक्षण अ, ब, क, ड उपवर्गीकरण करण्याच्या हालचाली आणि...

  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ

No Result
View All Result
  • होम
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • मराठवाडा
    • छत्रपती संभाजीनगर
    • जालना
    • बीड
    • नांदेड
    • परभणी
    • हिंगोली
    • उस्मनाबाद
    • लातूर
  • राजकारण
  • सामाजिक
  • शेक्षणिक
  • अर्थ/उद्योग
  • शेती
  • क्रीडा
  • मनोरंजन
  • चिंतन
  • आमच्याबद्दल
  • संपर्क
  • Login

© 2025 | देशनिष्ठ